देवळी : स्थानिक शिवसेना शाखेच्या वतीने शिवबंधन मेळावा घेण्यात आला. शामसुंदर अग्रवाल धर्मशाळेत आयोजित मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून माजीमंत्री व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अशोक शिंदे, अध्यक्षस्थानी शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश देशमुख व अतिथी म्हणून उपजिल्हा प्रमुख भारत चौधरी, आशिष पांडे, किशोर बोकडे, विनोद बाभुळकर उपस्थित होते. सर्व शिसैनिकांना अतिथींच्या हस्ते शिवबंधन बांधण्यात आले. शिवबंधनाचा भगवा धागा हा निष्ठेचा, समर्पणाचा व त्यागाचा प्रतिक आहे. जीव ओतून समाजासाठी कार्यं करा असे आवाहन अशोक शिंदे यांनी यावेळी केले. येणाऱ्या सर्व निवडणुका शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे त्यानी सांगितले. याप्रसंगी स्वातंत्र्य सैनिक विठाबाई गणपतराव ठाकरे, मोहन अग्रवाल, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक पवार, अशोक राऊत, दादा मून, दिलीप रूद्रकार आदींचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल डगवार यांनी केले. संचालन प्रवीण कात्रे व तालुका शिवसेना प्रमुख महेश जोशी यांनी आभार यांनी मानले. यशस्वीतेकरिता निलेश तिडके, निलेश मोटघरे, प्रकाश खडगी, ज्ञानेश्वर बेलखेडे, मारोती दरणे, सुरेश वैद्य, समीर निळे, किशोर चकोले, दिलीप वऱ्हाडे, समीर सायंकार, गोलू चाफले, अक्षय आडकीने, सनी तिवारी, विलास आंबटकर, व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)
शिवबंधन मेळावा
By admin | Published: August 27, 2016 12:33 AM