शिवसैनिकांच्या घरवापसीने भाजप-काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्याचा शिंदे गटासोबत घरोबा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2023 10:44 AM2023-03-30T10:44:56+5:302023-03-30T10:45:59+5:30

माजी मंत्री, माजी जिल्हाप्रमुखांचा पक्ष प्रवेश

Shiv Sainik Ashok Shinde return in the party shock to BJP-Congress | शिवसैनिकांच्या घरवापसीने भाजप-काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्याचा शिंदे गटासोबत घरोबा

शिवसैनिकांच्या घरवापसीने भाजप-काँग्रेसला धक्का; माजी मंत्र्याचा शिंदे गटासोबत घरोबा

googlenewsNext

वर्धा : कधीकाळी कट्टर शिवसैनिक असलेल्या माजी राज्यमंत्र्यांनी दीड वर्षापूर्वी काँग्रेसचा ‘हात’ धरला होता. तर माजी जिल्हा प्रमुखांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र, या दोघांचेही नव्या पक्षात मन रमत नसल्याने त्यांच्यातील शिवसैनिक जागा झाला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये त्यांनी प्रवेश केला. दोन्ही शिवसैनिकांच्या पक्ष प्रवेशामुळे जिल्ह्यातील भाजप आणि काँग्रेसलाही धक्का बसला.

वर्ध्यातील हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी शिवसेनेतील अंतर्गत कलहाला कंटाळून दीड वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी प्रदेश उपाध्यक्ष हे पद देण्याचे आश्वासन दिले होते. पण, आश्वासनाची पूर्तता न झाल्याने आणि पक्षामध्ये सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची खंत पत्रकार परिषदेत बोलून दाखवत त्यांनी गेल्या आठवड्यात काँग्रेसचा राजीनामा दिला. त्यामुळे अशोक शिंदे आता कोणत्या पक्षात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तसेच आर्वी विधानसभा क्षेत्रातून विधानसभा निवडणूक लढलेले आणि जिल्हा प्रमुखपद सांभाळणारे नीलेश देशमुख यांनीही शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केला होता.

गेल्या विधानसभा निवडणुकीपासून ते चांगलेच सक्रिय झाले होते. भाजपच्या आमदारांसोबतच राहणारे देशमुख यांना भाजपात मोठे पद मिळणार? अशी चर्चा होती. परंतु त्यांच्यासह माजी राज्यमंत्री अशोक शिंदे यांनी मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे आता या दोन्ही नेत्यांना मोठी जबाबदारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

Web Title: Shiv Sainik Ashok Shinde return in the party shock to BJP-Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.