लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपूर्वी करावी, या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढून सोमवारी शेकडो शिवसैनिकांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली. यावेळी सदर मागणीचे निवेदन जिल्हाधिकाºयांना सादर करण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्त्व माजी आमदार अशोक शिंदे, शिवसेना जिल्हा प्रमुख निलेश देशमुख, यांच्यासह राजेंद्र सराफ यांनी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाने १६ जून २०१७ रोजी राज्यातील शेतकºयांचे १.५० लाख रुपयांचे कर्ज माफ करण्यात येईल, असे जाहीर केले. यंदाच्या खरीपाच्या प्रारंभीच या योजनेचा गरजु शेतकºयांना लाभ मिळणे क्रमप्राप्त होते. परंतु, खरीप हंगाम संपण्याच्या मार्गावर असतानाही या योजनेचा थेट लाभ शेतकºयांना मिळालेला नसल्याची वास्तविकता आहे. सरकारने दिवाळीपूर्वी शेतकºयांवरील कर्जमाफ करू असे जाहीर केले असले तरी सध्याच्या परिस्थितीत शेतकºयांना खºया अर्थाने दिलासा देणे गरजेचे आहे.शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा अशी नव्याने ओळख मिळालेला वर्धा जिल्ह्यातील शेतकरी कर्जमाफीच्या अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे. काही महिने लोटल्यावर शेतकरी रब्बी हंगामाच्या तयारीला लागणार आहे. शेतकºयांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपूर्वी करून शेतकºयांच्या बँक खात्यात लाभाची रक्कम वळती करून त्यांचा सातबारा कोरा करावा, अशी मागणी निवेदनातून केली आहे. सदर आंदोलनात माजी पंचायत समिती सदस्य संतोष सेलूकर, भारत चौधरी, अनंत देशमुख, नामदेव कडु यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच शेतकरी सहभागी झाले होते.
कर्जमाफीच्या अंमलाकरिता शिवसेना रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 11:06 PM
राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जमाफीची अंमलबजावणी ३० सप्टेंबरपूर्वी करावी, या मुख्य मागणीसाठी मोर्चा काढून सोमवारी शेकडो शिवसैनिकांनी जिल्हाकचेरीवर धडक दिली.
ठळक मुद्देमोर्चा काढून शेतकºयांच्या उपस्थितीत शिवसैनिकांचे जिल्हाधिकाºयांना निवेदन