लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : सावंगी (मेघे) येथील ड्रीमलॅण्ड सिटीत वास्तू विश्व अपार्टमेंटमध्ये स्वीट अॅण्ड ट्रीट्स कॅफे हाऊस आहे. येथे मागील कित्येक दिवसांपासून हुक्का पार्लर सुरू होते. हे बंद करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने वारंवार सूचना केल्या. परंतु, याकडे दुर्लक्ष केल्याने गुरुवारी दुपारी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी हुक्का पार्लरवर धडक देत पार्लर बंद केले. तसेच आरोपीला सावंगी पोलिसांच्या स्वाधीन केले.सावंगी (मेघे) परिसरात अवैधरित्या दोन हुक्का पार्लर सुरू होते. लगतच वैद्यकीय व अभियांत्रिकी महाविद्यालय असल्याने विद्यार्थी येथे येऊन नशेत तरर्र होत होते. तसेच शहरातीलही युवक या पार्लरवर जाऊन नशा करायचे. मोठ्या प्रमाणात युवक व्यसनाधीन होत असल्याचे गांभीर्य ओळखून हे हुक्का पार्लर बंद करण्याच्या सूचना शिवसेनच्यावतीने करण्यात आल्या होत्या. तरीही हुक्का पार्लर सुरुच ठेवल्याने शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्या नेतृत्वात बुधवारी युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकली. हुक्का पार्लरची तपासणी केली असता अनेक प्रकारचे हुक्का साहित्य आढळून आले. याबाबत लगेच सावंगी पोलिसांना माहिती देण्यात आली. सावंगी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरिक्षक गजाजन दराडे यांच्यासह पोलीस पथक दाखल झाले. त्यांनी सर्व साहित्यानीशी हुक्का पार्लर चालकाला ताब्यात घेत गुन्हा दाखल केला.कारवाईत जिल्हाप्रमुख राजेश सराफ, उपजिल्हाप्रमुख किशोर बोकडे, अभिनंदन मुणोत, शहरप्रमुख लखन लोंढे, उप शहरप्रमुख बाळासाहेब साटोणे, जिल्हा समन्वयक मयूर जोशी, बादल श्रीवास, तालुका समन्वयक श्रीकांत चिमुरकर, शार्दूल वांदिले, राहुल पाटणकर, संदीप कांबळे, शहर समन्वयक आशिष मोहोड, प्रसन्ना काण्णव, शाखाप्रमुख प्रफुल्ल चकवे, प्रेम शेंडे, राकेश खोंडे, कुणाल मोरे यांच्यासह शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी आणि सैनिकांचा सहभाग होता.
शिवसेनेची सावंगीच्या हुक्का पार्लरवर धाड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2019 10:15 PM
सावंगी (मेघे) येथील ड्रीमलॅण्ड सिटीत वास्तू विश्व अपार्टमेंटमध्ये स्वीट अॅण्ड ट्रीट्स कॅफे हाऊस आहे. येथे मागील कित्येक दिवसांपासून हुक्का पार्लर सुरू होते. हे बंद करण्यासाठी शिवसेनेच्यावतीने वारंवार सूचना केल्या.
ठळक मुद्देसाहित्य जप्त : आरोपींना केले पोलिसांच्या स्वाधीन, महाविद्यालयीन विद्यार्थी गेले नशेच्या आहारी