शहरं
Join us  
Trending Stories
1
वर्ध्यातील इवोनिथ कंपनीत स्फोट; २२ कामगार भाजले, तिघांना नागपूरला हलविले
2
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
3
पोस्टल मतपत्रिका केली व्हायरल, जवानावर गुन्हा दाखल
4
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
7
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
8
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
9
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
10
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
11
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
12
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
14
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
15
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
16
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
17
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
18
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
20
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण

महागाईसह भारनियमनाच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2017 12:10 AM

वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिल्या जात आहे. इतकेच नव्हे तर १४ ते १६ तास भारनियमन सध्या करण्यात येत आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : दैनंदिन वापरातील वस्तुंचे दर गगनाला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाढलेल्या महागाईने सर्वसामान्य अडचणीत सापडले आहे. त्यावर योग्य उपाययोजना करण्याऐवजी केवळ विविध आश्वासने दिल्या जात आहे. इतकेच नव्हे तर १४ ते १६ तास भारनियमन सध्या करण्यात येत आहे. हा प्रकार सर्वसामान्यांच्या जखमेवर मिठ चोळण्यासारखा असल्याचा आरोप करीत भारनियमन व वाढलेल्या महागाईबाबत केंद्र व राज्य सरकारने तात्काळ योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच निवेदनही संबंधीतांना देण्यात आले.पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा सरकार बुलेट ट्रेन, मक इन इंडिया, समृद्धी महामार्ग, जागतिक संबंध व जीएसटी सारख्या दुय्यम प्रश्नामध्ये व्यस्त आहे. शिवसेना सरकारचाच एक भाग असला तरी सर्व सामान्यासह गोरगरीब व शेतकºयांच्या जिव्हळ्याच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी नेहमी पुढाकार घेते.जागतिक बाजारात कच्चा तेलाचे भाव ५३ टक्के कमी झाले आहे. पण, गत दहा वर्षात पेट्रोलचे दर वाढतच आहे. सध्या ८१.७३ रूपये प्रती लिटर दराने पेट्रोलची विक्री होत आहे. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने त्याचा परिणाम, जीवनावश्यक वस्तूंवर पडत आहे. दिवसेंदिवस महागाई वाढत असून भारनियमन कमी होताना दिसत नाही. सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने तात्काळ योग्य उपाययोजना आखून त्यांची प्रभावी अंमलबजाणी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.सदर निवेदन शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश सराफ यांच्या नेतृत्वात वर्धेचे तहसीलदार मनोहर चव्हाण व सेलूचे तहसीलदार सोनोने यांना देण्यात आले. याप्रसंगी माजी पं.स. सदस्य संतोष सेलूकर, शिवसेनेचे वर्धा तालुका प्रमुख गणेश इखार, सेलू तालुका प्रमुख रविंद्र चव्हाण, दिलीप भुजाडे, माजी उपजिल्हा प्रमुख किशोर बोकडे, सुनील पारसे, भाष्कर पराते, शहर प्रमुख विशाल वैरागडे, उपतालुका प्रमुख सागर मरघडे, मोहन येरणे, अमर गुंदी, सेलूचे मनीष व्यास, सतीश नवरखेले, विशाल व्यास, किशोर धोंगडे, अतुल जामुनकर, सुनील धोंगडे, अतुल जामुनकर, सुनील डोंगरे, लालचंद गलांडे, युवा सेनेचे मयूर जोशी, खुशाल राऊत, रवी दरवरे, अनंता साटोणे, रूपेश नगराळे, मुन्ना ठाकूर, नानाजी सोनटक्के, जगदीश कैकाडे, सतीश नवरखेडे, किशोर धोंगडे, अतुल जामुनकर, सचिन भोयर, भालचंद्र साटोणे, मोतीराम मडावी, नानाजी सोटक्के, जगदीश कैकाडे, नितीन सुरकार यांच्यासह शिवसैनिकांची उपस्थिती होती.