लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : लांब पल्ल्यावरील फेरीकरिता वातानुकूलित शिवशाहीवर चक्क अप्रशिक्षित चालकांना पाठविले जात असल्याने एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास असे ब्रीद असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या वर्धा आगाराने प्रवाशांच्या जीविताशी खेळ चालविल्याचा प्रकार उजेडात आला आहे.वर्धा विभागांतर्गत वर्ध्यासह आर्वी, हिंगणघाट, तळेगाव (श्यामजीपंत), पुलगाव हे आगार आहेत. संपूर्ण विभागात २६६ बसगाड्या आहेत. या गाड्यांत नोव्हेंबर महिन्यात चार वातानुकूलित, अत्याधुनिक शिवशाही बसगाड्यांची भर पडली. महिनाभरापूर्वी आगारात दाखल झालेल्या या गाड्या २३० अश्वशक्तीच्या असून यात सीसीटीव्ही कॅमेरे, संकटकालीन स्थिती निर्माण झाल्यास हॅगरची सुविधा, ड्रायव्हर अॅडजस्टमेंट सिट, ऑटो स्क्रीन या सोबतच दिल्लीत घडलेल्या निर्भया घटनेपासून पॅनिक बटणचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. आगामी काळात विभागातील सर्वच बसगाड्यांना व्हेईकल ट्रेकिंग सिस्टम (व्हीटीएस) ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. यामुळे प्रवाशांना घरबसल्या आणि कुठेही प्रत्येक बसगाडीचे ठिकाण कळणार आहे.प्रवाशांच्या सेवेत नव्याने आलेल्या शिवशाही बसेस रुजू करण्यात आल्या आहेत. सद्यस्थितीत वर्धा-शिर्डी आणि वर्धा-शेगाव अशा या गाड्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. आरामदायी प्रवास होत असल्याने प्रवाशांचीही या गाड्यांना पसंती आहे. सोई-सुविधांमुळे महामंडळ हायटेक होत असले तरी चालकांना चांगले प्रशिक्षण देण्यात महामंडळ उदासीन दिसत आहे.बहुतांशवेळी या गाड्यांवर अप्रशिक्षित चालक दिले जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. किरकोळ अपघातांमुळे चारपैकी तीन शिवशाही गाड्यांचे सुट्या भागांच्या रूपाने लाखोंचे नुकसान होत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गाड्यांवर होणाºया दुरुस्तीच्या खर्चामुळे शासनालाच आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. मात्र, याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे. भविष्यात मोठी अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण असेल, असा प्रश्न विचारला जात आहे. शिवशाही गाड्यांवर अप्रशिक्षित चालक देऊ नये, अशी मागणी होत आहे.प्रवाशांत भीतीचे वातावरणशिवशाही ही बसगाडी अत्याधुनिक आणि पूर्णत: इलेक्ट्रॉनिक आहे. या गाडीवर पाठविण्यापूर्वी चालकाला प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. मात्र, महामंडळ याकडे दुर्लक्ष करीत आहेत.साध्या बसगाड्यांवरील चालकांना शिवशाहीवर पाठविले जात असल्याने प्रवाशांतही चिंता व्यक्त होत आहे. विभाग नियंत्रकांनी याची दखल घेणे गरजेचे आहे.
‘शिवशाही’ अप्रशिक्षित चालकांच्या हाती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 6:00 AM
बहुतांशवेळी या गाड्यांवर अप्रशिक्षित चालक दिले जात असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. किरकोळ अपघातांमुळे चारपैकी तीन शिवशाही गाड्यांचे सुट्या भागांच्या रूपाने लाखोंचे नुकसान होत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. गाड्यांवर होणाºया दुरुस्तीच्या खर्चामुळे शासनालाच आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. मात्र, याकडे महामंडळाच्या अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष केले जात आहे.
ठळक मुद्देप्रवाशांच्या जीविताशी खेळ : गाड्यांचे लाखोंचे नुकसान