लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: दोन मित्रांच्या चटका लावणाऱ्या अनेक कहाण्या आपण ऐकतो. वर्धा जिल्ह्यातील मोठी आंजी येथील दोन मित्रांचीही कहाणी याच वर्गात मोडणारी ठरली. मोठी आंजी या गावातील अजाबराव बाजीराव भावरकर (७५) व रमेशराव धोंगडी (६५) हे दोघे अतिशय घनिष्ट मित्र. अजाबराव काही काळापासून आजारी होते. रविवारी सकाळी रमेशराव यांनी अजाबराव यांच्या प्रकृतीची फोनवरून चौकशी केली व ते आपल्या एका नातेवाईकाच्या लग्नासाठी म्हणून अमरावतीला गेले. दरम्यान अजाबरावांची प्रकृती अचानक ढासळली व सकाळी ११ च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. ही बातमी लग्नाला म्हणून अमरावतीला गेलेल्या रमेशरावांना जेव्हा कळली तेव्हा ते सर्व काही सोडून मित्राचे अंतिम दर्शन घ्यायला म्हणून बसने आर्वीकडे निघाले. आर्वी स्थानकावर बस पोहचल्यावर सर्व प्रवासी खाली उतरले. मात्र रमेशराव तसेच बसून होते. बस वाहकाने त्यांच्याजवळ जाऊन पाहिले असता त्यांचे बसल्याजागीच निधन झाल्याचे लक्षात आले. पुढील कारवाईसाठी बस पोलीस स्टेशनला नेण्यात आली. दोन मित्रांच्या या जिवलग मैत्रीच्या उदाहरणाने व दोघांच्याही निधनाने अवघे आर्वी गाव हळहळले.
धक्कादायक! मित्रापाठोपाठ दुसऱ्या मित्राने सोडला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 11:37 AM
दोन मित्रांच्या चटका लावणाऱ्या अनेक कहाण्या आपण ऐकतो. वर्धा जिल्ह्यातील मोठी आंजी येथील दोन मित्रांचीही कहाणी याच वर्गात मोडणारी ठरली.
ठळक मुद्देबसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू