शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
4
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
6
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
7
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
8
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
9
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
10
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
11
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
12
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

दुकान आॅनलाईन; पण दुकानदार सलाईनवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 11:49 PM

स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला सुधारित धोरणांप्रमाणे आॅनलाईन धान्य वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिलेत; पण यात बऱ्यांच त्रूटी आढळून येत आहे.

ठळक मुद्देपॉस मशीनमध्ये डाटा फिडींग झालीच नाही : व्यवहारात आॅफलाईन पद्धतीचा वापर

अमोल सोटे।ऑनलाईन लोकमतआष्टी (शहीद) : स्वस्त धान्य दुकानांतून शिधापत्रिकेवर प्रत्येक महिन्याला सुधारित धोरणांप्रमाणे आॅनलाईन धान्य वाटप करण्याचे आदेश पुरवठा विभागाने दिलेत; पण यात बऱ्याच त्रूटी आढळून येत आहे. यामुळे दुकानदारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, दुकान आॅनलाईनवर तर दुकानदार सलाईनवर, अशी स्थिती झाली आहे. या प्रकारामुळे बरेच दुकानदार राजीनामा देण्याच्या मानसिकतेत दिसत आहेत.पॉस मशीनमध्ये अंगठा (थम्ब) दिल्याशिवाय धान्याचे अनुदान मिळत नाही; पण बºयाच कार्डधारकांचे थम्ब लागत नाही. यामुळे सदर लाभार्थ्यांना वंचित न ठेवता आॅफलाईन पद्धतीने धान्य देण्याची मुभा आहे; पण आॅफलाईन धान्य वाटप केल्यानंतर दुकानदारांना याचा मोबदला मिळत नाही. यामुळे जवळचा पैसा गुंतवून पदरी उपेक्षा येताना दिसते. पॉस मशीनमध्ये अद्याप असंख्य कार्डधारकांचा आर.सी. नंबर नाही. कार्डच्या प्रतवारीत बदल झाला. त्याचा फटका वितरकाला बसतो. लाभार्थ्यांच्या कार्डावरील नंबर, कुटुंबातील सदस्य संख्या आणि एपीएल, बीपीएल, अंत्योदय, प्राधान्य गट यात गोंधळ असल्याने हिशेब जुळत नाही.खरे गरजवंत वंचितचफेब्रुवारी २०१८ या चालू महिन्यात प्रथमच आॅफलाईनचा नमुना स्वस्त धान्य दुकानात देऊन त्यावर वितरण करा, असा स्पष्ट आदेश पुरवठा विभागाने दिला. त्याची अंमलबजावणीही केली. असे असताना दुकानदारांना आॅफलाईनचे बील देण्यास टाळाटाळ केली जात आहे. शासन शिक्षक तथा मोठ्या वेतनावर नोकरी करणाऱ्या वर्गालाही एपीएलमधून धान्य देत आहे तर अपंग, मजुरी करणारे, रिक्षावाले, भिक्षेकरी हा वर्ग मात्र वंचित आहे. त्यांचाही तगादा धान्य दुकानदारांना सोसावा लागत आहे. यामुळे सर्व सुविधायुक्त आॅनलाईन पद्धत सुरू करणे तथा त्याचा योग्य मोबदला दुकानदारांना देणे गरजेचे आहे.