लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव (श्या.पंत.) : आष्टी मार्गावर भरधाव कंटेनर व रापमची बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. ही घटना मंगळवारी स्थानिक कृषी फलोत्पादनाच्या कार्यालया समोर घडली. या अपघातात कुणी जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठी घटना टळली.प्राप्त माहितीनुसार, वर्धा-मोर्शी ही रापमची बस तळेगाव आगारातून मोर्शीच्या दिशेने जाण्यासाठी निघाली. देवगाव मौजात सुरू असलेल्या चार पदरी सिमेंटरोडच्या रस्त्यावर धुळ उडू नये तेथे पाणी टाकले जाते याच परिसरात बस आली असता समोरून येणाऱ्या कंटेनरने धडक दिली.विशेष म्हणजे, दोन्ही वाहने समोरासमोर आल्यावर चालकांनी ब्रेक मारला; पण दोन्ही वाहनात धडक झाली. यात कुणी जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच आगार व्यवस्थापक पांडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली. या घटनेची नोंद तळेगाव पोलिसांनी घेतली आहे. पुढील तपास तळेगाव पोलीस ठाण्यातील जमादार कैलास माहूरे करीत आहेत.ट्रॅक्टर उलटला; एक ठार तर एक गंभीरपवनार : भरधाव असलेला ट्रॅक्टर अनियंत्रित होत उलटला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास घडली. मंगेश किसना भट (२०) असे मृतकाचे तर नितीन पाटील असे गंभीर जखमीचे नाव आहे. मंगेश व नितीन हे दोघे ट्रॅक्टरच्या सहाय्याने पाटील यांच्या शेतात कल्टीव्हेटर करून रात्रीला स्मशानभूमी मार्गाने गावाकडे येत होते. भरधाव वाहन नवीन पुलाजवळ आले असता चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. दरम्यान ट्रॅक्टर उलटला. यात मंगेशचा जागीच मृत्यू झाला तर नितीन हा गंभीर जखमी झाला. हा ट्रॅक्टर मनोहर लाकडे यांच्या मालकीचा असल्याचे सांगण्यात येते.
बस-कंटेनरची समोरासमोर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 10:09 PM
आष्टी मार्गावर भरधाव कंटेनर व रापमची बस यांच्यात समोरासमोर धडक झाली. ही घटना मंगळवारी स्थानिक कृषी फलोत्पादनाच्या कार्यालया समोर घडली. या अपघातात कुणी जखमी झाले नसले तरी दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेष म्हणजे, चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठी घटना टळली.
ठळक मुद्देचालकाच्या समयसूचकतेने टळली मोठी घटना