लोकमत न्यूज नेटवर्क रोहणा : सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धेच्या निमित्ता दिघी-सायखेडा गट ग्रा.पं. अंतर्गत हिवरा पहाडीनजीक वर्धा जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या २०० ग्रामसेवकांनी श्रमदान करीत गावकऱ्यांचा उत्साह द्विगुणित केला. यापूर्वी येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनीही स्वत: श्रमदान करून स्पर्धेनिमित्त असलेल्या कामांचा आढावा घेत समाधान व्यक्त केले. शनिवारी जिल्ह्यातील अनेक गावांतील २०० ग्रामसेवकांनी पहाडाच्या खालच्या जमिनीत विशिष्ट अंतरावर चर खोदून नाल्या ेकाढल्या. त्याभोवती गोट्यांची पाळ रचली. यामुळे पहाडावरून वाहणारे पाणी जमिनीत मुरण्यास मदत होईल. गावात शोषखड्डे, नाला खोलीकरण शेतातील बांध निर्मिती अशी अनेक कामे झाली आहेत. विविध संघटनांच्या श्रमदानामुळे गावातील लोकांचाही हुरूप वाढत असून कामे वेगाने होत आहेत. ग्रामसेवक संघटनेचे जिल्हाध्यक्ष हेमंंत भोमले, सचिव प्रवीण सोंढे, कार्याध्यक्ष रोहणकर, कृषी सहायक खोंडे यांनी श्रमदान करून गावकऱ्यांचा उत्साह वाढविला.
दिघी सायखेडा येथे ग्रामसेवकांचे श्रमदान
By admin | Published: May 08, 2017 12:40 AM