शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
हातात संविधानाची प्रत घेत प्रियंका गांधी यांनी घेतली लोकसभा सदस्यत्वाची शपथ  
3
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
4
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
5
"त्या दोघांचं अफेयर...", कंगना राणौत-आदित्य पांचोलीच्या एक्स्ट्रा मॅरिटल अफेयर्सवर जरीना वहाबचा धक्कादायक खुलासा
6
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
7
HAL, IREDA सह 'या' स्टॉक्सवर ब्रोकरेज बुलिश, खरेदीचा सल्ला; तेजी कायम राहण्याची शक्यता, तुमच्याकडे आहेत?
8
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
9
'सिंघम अगेन'बद्दल नाना पाटेकरांचं रोखठोक मत; म्हणाले - "बाकीच्या लोकांच्या कुबड्या घेण्याची..."
10
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
11
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
12
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
13
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
14
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
15
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
16
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
17
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
18
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
19
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
20
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा

जादूटोण्याच्या संशयावरून ‘श्रावण’ची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2019 12:14 AM

देवळी तालुक्यातील इंझाळा येथील शेतातील गोटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी रखवालदार श्रावण पंधराम याला मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान श्रावणचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुलगाव पोलिसात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध सुरु होता.

ठळक मुद्देपाच हजारात तिघांनी घेतली सुपारी : इंझाळा येथील घटनेचे रहस्य उलगडले

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : देवळी तालुक्यातील इंझाळा येथील शेतातील गोटफॉर्मवर चोरीच्या उद्देशाने आलेल्यांनी रखवालदार श्रावण पंधराम याला मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारादरम्यान श्रावणचा मृत्यू झाला. या प्रकरणी पुलगाव पोलिसात मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपीचा शोध सुरु होता. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जादूटोण्याच्या संशयावरुन केवळ पाच हजारांची सुपारी घेवून श्रावणची हत्या केल्याचे आत्तापर्यंतच्या पोलीस तपासात पुढे आले आहे.इंझाळा येथील शेतकरी मंगेश भानखेडे यांच्या शेतातील गोटफॉर्मवर बुधवारी रात्रीला काही जण आले. त्यांनी पळ काढण्यापूर्वी रखवालदार श्रावण पंधराम याला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. शेतातून पळ काढताना आरोपींपैकी एक जण शेतातील विहिरीत पडला. त्याला शेतमालक मंगेश भानखेडे यांनी रखवालदार समजून विहिरीबाहेर काढले होते. परंतु, मोठ्या शिताफिने त्यानेही घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी पुलगाव पोलिसात भादंविच्या कलम ३०२ अन्वये अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यापासून पुलगाव पोलीस आरोपींचा शोध घेत होते. परंतु, त्यांना यश आले नसल्याने हे प्रकरण स्थानिक गुन्हे शाखेकडे वळते करण्यात आले. दरम्यान माहितीच्या आधारे पोलिसांनी रमेश शंकर पाखरे (४०) रा. इंझाळा, ईश्वर अशोक पिंजरकर (३६), अंकुश उर्फ मोन्या विलास शेंडे (२४) दोन्ही रा. नाचणगाव आणि नाचणगाव येथील रहिवासी असलेल्या एका १६ वर्षीय तरुणाला ताब्यात घेतले. सुरुवातीला उडवा-उडवीचे उत्तर देणारे हे संशयीत पोलिसी हिसका दाखविताच बोलके झाले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्यावर तिनही आरोपींना पोलिसांनी अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, अपर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे यांच्या निर्देशाप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक महेंद्र इंगळे, पंकज पवार, आशीष मोरखडे, निरंजन वरभे, यशवंत गोल्हर, रितेश शर्मा, दिनेश बोथकर, संघसेन कांबळे, विकास अवचट, राकेश आष्टनकर आदींनी केली.‘अनिकेत’च्या मृत्यूस श्रावण जबाबदार असल्याचा ठेवला ठपकाइंझाळा येथील रमेश पाखरे याचा मुलगा अनिकेत (१८) याचा मार्च २०१८ मध्ये मृत्यू झाला. अनिकेतवर श्रावणनेच जादूटोणा केला, त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला. शिवाय सध्या माझ्या दुसऱ्या मुलाचीही प्रकृती ठिक नाही. त्याच्यावरही श्रावणने जादूटोणा केला. अनिकेतचा जादूटोणा करून श्रावणने बळी घेतला त्यामुळेच आपण त्याचा काटा काढल्याचा कट रचला अशी कबुली या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या रमेश पाखरे याने पोलिसांना दिली. पुढील तपास सुरू आहे.हार्डवेअरच्या दुकानातून लाकडी दांड्याची खरेदीया प्रकरणातील आरोपी ईश्वर पिंजरकर हा मुख्य आरोपी असलेल्या रमेश पाखरे याचा साडभाऊ आहे. मुख्य आरोपीने साडभावाच्या मध्यस्तीने इतर तीन आरोपींना श्रावणच्या हत्येसाठी पाच हजार रुपयाचे आमिष दिले. नियोजन झाल्यानंतर आरोपींनी मृतकाला मारण्याकरिता नाचणगाव येथील एका हार्डवेअरच्या दुकानातून लाकडी दांडा खरेदी केला. त्यानंतर श्रावणचा काटा काढण्याच्या उद्देशाने आलेल्या अल्पवयीन मुलासह इतर आरोपींना मुख्य आरोपी रमेश पाखरे यांने त्याच्या घरी आश्रय दिल्याचेही तपासात पुढे आले.

टॅग्स :Murderखून