शहरं
Join us  
Trending Stories
1
"जयंत पाटलांमध्ये महाराष्ट्र सांभाळण्याची..."; शरद पवारांचे सूचक विधान, नेमकी चर्चा काय?
2
VBA Candidate List 2024: आंबेडकरांनी 30 उमेदवारांची केली घोषणा; आदित्य ठाकरेंविरोधात कोण?
3
"मुख्यमंत्री होण्यासाठी लय उठाबशा काढाव्या लागतात"; जयंत पाटलांची कार्यकर्त्याला तंबी
4
नागपूर : न केलेल्या गुन्ह्यात १९ दिवस गेला कारागृहात अन्...; पोलिसांच्या चुकीची भोगतोय शिक्षा
5
विधानसभा निवडणूक लढणार की नाही? बावनकुळेंचं उमेदवारीबद्दल पहिल्यांदाच भाष्य
6
नागपूर : ‘तुझे राजकारण संपले’ म्हणत काँग्रेस पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला
7
श्याम मानव यांच्या कार्यक्रमात भाजप कार्यकर्त्यांचा गोंधळ, नक्की काय घडलं?
8
'ट्रूडोंसोबत माझे थेट संबंध, मीच भारतविरोधी माहिती पुरवली', खालिस्तानी पन्नूचा मोठा खुलासा
9
न्यायदेवतेच्या डोळ्यावरील पट्टी उघडली; आता नवीन मूर्ती समोर आली, काय आहे खास?
10
विधानसभा निवडणूक: महाराष्ट्रातील मतदारांना कधीपर्यंत करता येणार नोंदणी?; जाणून घ्या तारीख
11
झिशान सिद्दिकी सहपोलीस आयुक्तांच्या भेटीला; नेमकी काय चर्चा झाली?
12
"संबधित निशाणी रद्द करून देतो"; जितेंद्र आव्हाडांचा मुख्य निवडणूक आयुक्तांवर गंभीर आरोप
13
भारताशी पंगा, पडला 'महंगा'! स्वपक्षाच्या खासदारानेच मागितला PM जस्टीन ट्रुडोंचा राजीनामा
14
वक्फच्या जमिनीवर बनलीय संसदेची नवी इमारत; मौलाना बदरुद्दीन अजमल यांचा मोठा दावा
15
पवारांसोबत चर्चा सुरू असतानाच स्नेहलता कोल्हेंनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट
16
भयंकर घटना! टँकर पलटला, पेट्रोल गोळा करण्यासाठी लोकांनी केली गर्दी, तेवढ्यात झाला मोठा स्फोट, ९४ जणांचा मृत्यू
17
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुतीला जबर धक्का, जुन्या मित्रपक्षानं सोडली भाजपाची साथ, स्वबळावर लढणार 
18
"...तर त्याच्यावर निश्चित कारवाई होईल"; 'व्होट जिहाद' शब्दाबद्दल ECI ची भूमिका काय?
19
'लाडकी बहीण' सारख्या योजनांसाठी 'महायुती'कडे पैसे कुठून आले? देवेंद्र फडणवीसांनी दिलं उत्तर
20
सहारा वाळवंटात आला महापूर, जिकडे तिकडे पाणीच पाणी, कारण काय?

‘शकूनी’च्या ‘शतरंज’ची मोबाईलवर धूम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2017 12:31 AM

‘शतरंज’ या मनोरंजनात्मक खेळाला पौराणिक इतिहास आहे. महाभारतात कौरवांचा मामा शकूनी हा शतरंजमध्ये पारंगत होता.

लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : ‘शतरंज’ या मनोरंजनात्मक खेळाला पौराणिक इतिहास आहे. महाभारतात कौरवांचा मामा शकूनी हा शतरंजमध्ये पारंगत होता. याच खेळात पांडव आपले राज्य हारले व वनवासी झाले. महाभारतकालीन शतरंजचा हा खेळ सध्या आधुनिक काळातील मोबाईलवर अधिराज्य गाजवित आहे. मोबाईलमध्ये ‘लुडो किंग’ या नावाने आलेला हा खेळ सोफिस्टीकेट जुगार ठरत आहे. तो सर्वत्र खेळला जात असून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. महाभारतात कौरवांना पांडवांचे राज्य हस्तगत करावयाचे होते. यासाठी शतरंज या खेळाचे आयोजन करीत शकूनी मामाने पांडवांना नमविले. हस्तीनापूर राज्यासह द्रौपदीही कौरवांनी जिंकल्याची आख्यायिका आहे. यात शतरंज या खेळाची भूमिका निर्णायक ठरली होती. १५-२० वर्षांपूर्वी हा खेळ आबालवृद्ध खेळत होते. काही ठिकाणी जुगार म्हणून तर कुठे मनोजरंजन म्हणून या खेळाकडे पाहिले जात होते. कालौघात हा पौराणिक खेळ लुप्तच झाला. आता प्रगत तंत्रज्ञानाने या पौराणिक खेळाला पुन्हा एकदा जिवंत केले आहे. ‘लुडो किंग’ या नावाने हा ‘गेम’ आता प्रत्येकाच्या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये दिसू लागला आहे. कुठे केवळ मनोरंजन म्हणून तर बहुतांश युवक जुगार म्हणून हा खेळ खेळत असल्याचे पाहावयास मिळत आहे. यामुळे शकूनीच्या शतरंजची मोबाईलवर धूम दिसून येते. वर्धा जिल्ह्यात सवड मिळताच चार, दोन, तीन युवक मोबाईलवर हा खेळ खेळत असल्याचे दिसून येते. ५० रुपये, १०० रुपये, ५०० रुपये प्रती गेम याप्रमाणे लुडो किंगवर जुगार खेळला जात आहे. बस, ट्रेन, पानठेले, चहा कॅन्टीन, हॉटेल आदी अनेक ठिकाणी हा जुगार खेळला जात असल्याचे दिसते. मोबाईलवर खेळत असल्याने कुणाला जुगार सुरू आहे, हे लक्षात येत नाही. शिवाय पैसे वर दिसत नसल्याने जुगारच खेळत आहे, हे सिद्ध करता येत नाही. यामुळेच लुडो किंग हा जुगाररूपी खेळ युवकांमध्ये प्रसिद्ध होत आहे. वर्धा शहरात काही दिवसांपूर्वी ‘तीन पत्ती’ या आॅनलाईन मोबाईल गेमच्या माध्यमातून मोठा जुगार खेळला जात असल्याचे समोर आले होते. याप्रमाणेच आता लुडो किंग या गेमचेही अड्डे तयार झाले आहेत. वर्धा, पुलगाव शहरात तर अनेक ठिकाणी हा मोबाईल जुगार चवीने खेळला जात आहे. आता पोलिसांना हे जुगार अड्डे शोधून काढण्याचे आव्हान पेलावे लागणार असल्याचेच चित्र आहे. तीन पत्तीतून झाली होती उलाढाल अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये तीन पत्ती हा आॅनलाईन गेम काही वर्षांपूर्वी आला होता. प्रारंभी हा आॅनलाईन खेळ मनोरंजनच वाटत होता; पण वर्धेतील जुगाऱ्यांनी यातही नवी शक्कल लढविली. काही युवकांना रोजगार देत चक्क एकमेकांच्या खात्यात पैसे जमा करण्याचे प्रकार होत होते. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच धाड टाकली असता धक्कादायक जुगाराचा प्रकार समोर आला होता. यात मोबाईल जप्त करीत काहींना अटक करण्यात आली होती. आता लुडो किंग या जुगाराचे अड्डे पोलिसांना शोधावे लागणार आहेत. प्रत्येक मोबाईलवर लुडो किंग सध्या प्रत्येक युवकाच्या अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईलमध्ये लुडो किंगने एन्ट्री केली आहे. जो-तो लुडो खेळत असल्याचेच दिसते. जिल्ह्यात अनेक ठिकाणी या खेळाचे अड्डे तयार झालेत. दोन, तीन वा चार युवक एकत्र येऊन मोबाईलवर हा जुगार खेळत असल्याचे चित्र सर्वत्र दिसते. काही ठिकाणी तर दुकानांतही ग्राहक नसल्यास हा जुगार खेळला जात असल्याचे दिसते.