शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?
2
प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याच्या चर्चांवर नाना पटोलेंनी सोडलं मौन; म्हणाले...
3
उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे आणि सुनील प्रभूंवर सोपवली मोठी जबाबदारी, या पदांवर केली नियुक्ती 
4
पुन्हा पक्षफुटीची भीती? उद्धव ठाकरेंची खास रणनीती, नव्या २० आमदारांना शपथबद्ध करणार!
5
Animal चा समाजावर वाईट परिणाम; रणबीर कपूर म्हणाला, "मलाही तुमचं मान्य आहे..."
6
"अजित पवार यांना मुख्यमंत्री, तर मला मंत्री करा’’, राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केली इच्छा
7
थोरातांच्या पराभवानंतर सत्यजित तांबे अजित पवारांच्या भेटीला; म्हणाले, "त्यांच्यासारखा माणूस..."
8
"बिहार खड्ड्यात गेलाय’’, पोटनिवडणुकीतील पराभवानंतर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया 
9
IND vs AUS :आम्ही दबावात होतो; पण... बुमराहनं शेअर कमबॅक मागची स्टोरी
10
विदर्भातील 'या' १२ आमदारांना मतदारांनी नाकारले; महायुतीच्या आमदारांनाही दिला झटका 
11
पेन्शनधारकांनो, नो टेन्शन; हयातीचा दाखला मिळणार घरपोच!
12
IPL Auction 2025: "थोडे जास्तच पैसे गेले, आम्ही रिषभ पंतसाठी..."; LSGच्या मालकांनी सांगितला 'फसलेला' प्लॅन
13
Gold Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; पटापट चेक करा दिल्ली ते कोलकात्यापर्यंतचे दर
14
"कुटुंबात 4 जण, मतं मिळाली फक्त 2", 'तो' व्हिडीओ शेअर करत अभिनेत्यानं EVM वर घेतला संशय
15
लाडक्या बहिणींना पहिला हप्ता कधी येणार? १५०० की २१०० रुपये...; दिवाळी बोनस मिळणार की नाही...
16
मला फक्त विधानपरिषद नको, गृह किंवा अर्थखातं हवं; लक्ष्मण हाकेंची महायुतीकडे मागणी
17
Video: उच्चशिक्षित इंजिनीअर, प्रेयसीच्या विरहात बनला भिकारी; अवस्था पाहून लोकंही हळहळले
18
Maharashtra Vidhan Sabha Elecation 2024: नाना पटोलेंवर प्रफुल्ल पटेल वरचढ!
19
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवालांची खेळी, वृद्धांसाठी मोठी घोषणा, दरमहा मिळणार 'इतकी' पेन्शन!
20
उर्वशी रौतेलाने सांगितलं अद्याप अविवाहित असल्याचं कारण; म्हणाली, "माझ्या जन्म पत्रिकेत..."

जिल्ह्यात सिकलसेल रुग्णांत वाढ

By admin | Published: January 25, 2017 12:46 AM

गंभीर व अनुवांशिक असलेल्या सिकलसेलची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी ठरत आहे.

नऊ लाख नागरिकांची तपासणी : जिल्ह्यात २८ हजार ६८ रोगवाहक गौरव देशमुख   वायगाव (नि.) गंभीर व अनुवांशिक असलेल्या सिकलसेलची वाढती रुग्णसंख्या चिंता वाढविणारी ठरत आहे. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सामान्य रुग्णालयात २००९ पासून तर जिल्ह्यात २०१०-११ पासून सुरू करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात १ ते ३० वर्षे वयोगटातील ८ लाख ८२ हजार ८०१ नागरिकांची तपासणी करण्यात आली. यात १ हजार ४७२ सिकलसेलग्रस्त रुग्ण आणि २८ हजार ६८ सिकलसेल वाहक आढळून आलेत. सदर रुग्णांना उपचारासाठी शासनाकडून औषधी पुरवठा केला जात आहे. सिकलसेल आजारात लाल रक्तपेशी आपला गोल आकार बदलवून कोयत्याच्या आकाराच्या बनतात. साधारण रक्तपेशी गोल असल्याने त्या शरीराच्या सर्व भागात रक्त वाहून नेतात; सिकलसेल आजार जडलेल्या व्यक्तीच्या रक्तपेशी रक्तवाहिन्यांतून रक्त वाहून नेऊ शकत नाहीत. त्या घट्ट आणि चिकट होतात. ते रक्त वाहिन्यांमध्ये अडकून अडथळा निर्माण करतात. परिणामी, अवयवांना पुरेसे आॅक्सिजन मिळत नसल्याने अवयव निकामी होतात. सिकलसेलग्रस्त रुग्णांचे समुपदेशन करणे, त्याच्या रक्ताची तपासणी करण्याचे कार्य जिल्हा सामान्य रुग्णालय, ग्रामीण रुग्णालये, उपजिल्हा रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून करण्यात येतात. वाढत्या रुग्णसंख्येवर केवळ नियंत्रण हाच उपाय आहे. सिकलसेल नियंत्रण कार्यक्रम सिकलसेल आजाराची तपासणी सोल्युक्लिटी, इलेक्ट्रोफोरेसिस आणि एचपीएलसी या पद्धतीने केली जाते. सोल्युबिलिटी चाचणी ही सर्व रुग्णालयांमध्ये केली जाते; पण इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी केवळ आर्वी, हिंगणघाट येथील उपजिल्हा तथा वर्धा सामान्य रुग्णालय या तीन ठिकाणीच केली जाते. एचपीएलसी तपासणी मात्र नागपूर येथील एक शासकीय रुग्णालयत आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर येथील रुग्णालयामध्ये करण्यात येते. आई आणि वडील हे दोन्ही सिकलसेलग्रस्त व वाहक असतील तर अपत्यांनाही हा आजार होतो. यामुळे समाजातील सिकलसेल वाहक व्यक्ती शोधून काढणे आणि त्यांचे आपापसातील विवाह टाळणे गरजेचे झाले आहे. समाज सिकलसेलमुक्त करण्यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे. लग्नापूर्वीच सिकलसेल रक्त तपासणी करणे हाच निरोगी अपत्याला जन्म देण्याचा एकमेव व साधा उपाय आहे. यामुळे जोडप्यांनी सिकलसेलची तपासणी करून घेणे आवश्यक झाले आहे. सदर रुग्णांना शासनाकडून आर्थिक मदतही केली जाते. रुग्णांना मोफत रक्त देण्यासोबतच औषध आणि उपचाराकरिता प्रशासनाकडून दरमहा ६०० रुपयांची मदत केली जाते. विभागासह विविध सवलती दिल्या जातात.