विजय माहुरे सेलूजिल्ह्यात कडकडीत ऊन्ह तापत आहे. अशात पावसाने अधूनमधून पावसाची हजेरी लावली. यामुळे पाहता ओलिताची सोय असलेले शेतकरी रोहिणी नक्षत्रात कपाशीची पेरणी करण्याच्या तयारीला लागले आहेत. गत तीन वर्षांपासून जिल्हातील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटांचा सामना करीत आहे. यातून सावरून शेतकरी पुन्हा एकदा आशेचा किरण घेऊन कपाशी लागवडीला सामोरा जात आहे. उन्हाळवाहीची कामे सुरू असताना एप्रिल व मे महिन्यात पावसाने हजेरी लावली. आलेल्या पावसामुळे नांगरणी केलेल्या शेतात पुन्हा तण उगवायला सुरुवात झाली. परिणामी शेतकऱ्यांना दुबार नागरणीच्या खर्चाला सामोरे जावे लागले.बहुतांश शेतकरी कपाशी लागवड व सोयाबीनची पेरणी मृग नक्षत्रात दमदार पावसानंतरच करतात. पण ओलिताची सोय असलेले शेतकरी हवामानाचा अंदाज घेत अवघ्या काही दिवसांनी सुरू होणाऱ्या रोहिणी नक्षत्रातच ठिबक व तुषार सिंचनावर कपाशी लागवडीची तयारी करीत आहे. रोहिणी नक्षत्रात कपाशीची लागवड केल्यास शेतकऱ्यांना रोपटे जगविण्यासाठी त्रास घ्यावा लागत असला तरी अधिक उत्पन्न येण्याचे शेतकरी सांगत आहे. ७ जूनपासून मृग नक्षत्राला सुरुवात होणार आहे. या नक्षत्रात पाऊत येतोच, असा अंदाज शेतकऱ्यांचा आहे. त्यामुळे सेलू परिसरात अवघ्या काही दिवसांतच कपाशीच्या लागवडीला सुरुवात होणार असल्याचे चित्र आहे.काही वर्षांपूर्वी पीक पेरणीपूर्वी धूळ पेरणी केली जात होती. पाऊस आला की पेरलेल्या बिजांना अंकूर फुटायचे. गत काही वर्षांपूर्वी ओलिताचे नवनवीन तंत्रज्ञान विकसित झाले आहे. अनेक शेतकरी आधुनिक पद्धतीचा अवलंब करीत ठिबक व तुषार सिंचनाच्या सहाय्याने पीक घेतल्या जात आहे. या काही वर्षात धूळपेरणी हा प्रकार खूपच कमी झाला असून काहीच ठिकाणी धूळपेरणी केली जात आहे. वाढीव दरामुळे तुरीचा पेरातुरीला या वर्षी मिळालेला भाव पाहता तुुरीचा पेरा वाढणार असा अंदाजही शेतकरी व्यक्त करीत आहेत. यंदा सोयाबीनचा पेरा वाढणारअधिक उत्पन्न मिळावे म्हणून कॅश क्रॉप असलेल्या ऊस लागवडीकडे कल वाढत आहे. ऊस लागवड करावयाची असल्यास आधी सोयाबीनची पेरणी करणे गरजेचे असते. त्यामुळे सोयाबीनचा पेरा जिल्ह्यात वाढण्याची शक्यता आहे. सोयाबीनची मळणी होताच ऊस लागवड केली जाते. कृषी विभाग व शेतकऱ्यांत नियोजनाची तफावतकृषी विभागाने केलेल्या खरीपाच्या नियोजनात कपाशीचे लागवड क्षेत्रात वाढणार असे दर्शविले आहे, परंतु सतत तीन ते चार वर्षांपासून कापसामुळे शेतकरी आर्थिक गार्तेत सापडला आहे. यामुळे कापूस का लावावा असे मत जिल्ह्यातील शेतकरी व्यक्त करीत आहेत. सोयाबीन पेरल्यास रब्बी हंगामात गहू, चणा, भूईमूंग व ऊस आदी पिके घेतली जातात. यामुळे कृषी विभागाच्यावतीने केलेल्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
रोहिणी नक्षत्रात कापूस लागवडीचे संकेत
By admin | Published: May 24, 2015 2:29 AM