शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

पोलिसांच्या ‘पीए’ चे वाहतुकीबाबत मौन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2018 11:57 PM

शहरातील मुख्य मार्गावरील तसेच बाजारपेठेतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरातील पाच मुख्य चौकामध्ये पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम (पी.ए.) लावण्यात आली आहे.

ठळक मुद्देपब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम बंद : आता सूचना मिळेना

आनंद इंगोले।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील मुख्य मार्गावरील तसेच बाजारपेठेतील वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून शहरातील पाच मुख्य चौकामध्ये पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम (पी.ए.) लावण्यात आली आहे. या प्रणालीव्दारे ‘वाजताच भोंगा टवकारतात कान, सुरळीत होतात विस्कळीत वाहन’ अशी परिस्थिती निर्माण झाली होती. परंतु, अल्पावधीच ही प्रणाली बंद पडल्याने आता वाहनचालकांना सूचना मिळणेही बंद झाले. परिणामी पुन्हा विस्कळीत वाहतूकीचा सामना करावा लागत आहे.शहराचा आवाका दिवसेंदिवस वाढत असल्याने वाहनांचीही संख्या त्या तुलनेत झपाट्याने वाढली आहे. पण, बाजारपेठेत वाहनतळाची कुठेही सुविधा नसल्यामुळे वाहतुकीची कोंडी नित्याचीच झाली होती. तसेच शहरात दरम्यानच्या काळात बाजारपेठेत चोरट्यांनीही धुमाकूळ घातला होता. म्हणून पोलीस प्रशासनाच्यावतीने ही वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी व चोरट्यावर वॉच ठेवण्यासाठी शहरातील प्रमुख २२ चौकांमध्ये सिसीटिव्ही कॅमेरे व पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम लावण्यात आली. या प्रणालीव्दारे गुन्हेगारांसह वाहनचालकांच्या हालचाली टिपल्या जायच्या. वाहनचालकाने रस्त्यावर कुठेही वाहन उभे केले तर लगेच पिएच्या माध्यमातून सूचना मिळायच्या. सूचना मिळताच वाहनचालक आपले वाहन बाजुला लावत किंवा वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहचून सूचनांचे पालन करण्याच भाग पाडायचे. पण दीड वर्षातच ही प्रणाली बंद पडल्याचे चित्र आहे. आता ना भोंगा वाजत ना वाहतुकीची कोंडी सुटत. पण, वाहतूक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याच्या कामाला दुय्यम स्थान देऊन चालान फाडण्याचा एककलमी कार्यक्रम हाती घेतला आहे.या अनोख्या प्रणालीबाबत...शहरातील प्रमुख २२ चौकामध्ये ८० सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले आहे. यातील पाच चौकात पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम म्हणजेच पिए सिस्टीम बसविण्यात आली. याचे कनेक्शन थेट पोलीस अधीक्षक कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये आहे. त्यामुळे शहरातील चौकामध्ये वाहतुकीची कोंडी, रस्त्यावरील वाहनांची पार्कींग आदी बाबी दिसताच कंट्रोल रुममधून लगेच सूचना करुन त्या पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीमव्दारे चौका-चौकात ऐकायला येतात. सूचना ऐकताच नागरिक किंवा वाहनचालक स्वत:च वर्तनात सुधारणा करतात, अशी ही प्रणाली सुरु करण्यात आली; पण अल्पावधीतच बंद पडल्याने कोटीचा निधी व्यर्थ गेल्याची चर्चा होत आहे. वरिष्ठांकडून दखल घेण्याची गरज निर्माण झाली आहे.शहरात पाच ठिकाणी पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम लावण्यात आली आहे. यापैकी रेल्वे स्थानक चौकातील सिस्टीम तांत्रिक बिघाडामुळे बंद आहे. तसेच सराफा लाईनमधील व्यावसायिकांच्या तक्रारीमुळे तेथील सिस्टिमचा आवाज कमी करण्यात आला. इतर सर्व सिस्टिम सुरु असून शहरात ८० सीसीटिव्हीचा वॉच आहे. कंट्रोल रुममध्ये सात कर्मचारी कार्यरत आहे.- सारंग बोंपल्लीवार, पोलीस उपनिरिक्षक, वर्धा.जुनेच दिवस परत आले...न.प. व पोलीस प्रशासनाच्या उदासिन धोरणामुळे लाखो रुपये खर्चुन लावलेले सिग्नल शोभेचे ठरले आहे. शहरातील वाहतुकीची समस्या लक्षात घेता स्मार्ट शहर प्रकल्पांतर्गत जिल्हाधिकाऱ्यांनी १ कोटी ८० लाखाचा निधी पोलीस प्रशासनाला उपलब्ध करुन दिला. या निधीतून शहरातील २२ चौकात ८० सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यात आले. त्यातील पाच चौकात सीसीटिव्ही सोबतच पब्लिक अ‍ॅड्रेस सिस्टीम अंतर्गत भोंगे लावण्यात आले. या आधारे हालचाली टिपून भोंग्याव्दारे सूचना दिल्या जायच्या. यामुळे वाहतुकीला शिस्त लागली होती. सीसीटीव्ही सुरु अन् भोंग्याचा आवाज बंद आहे.

टॅग्स :Policeपोलिस