शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांमुळे मंत्रिपदे गेली, आता किमान १०-१२ जागा हव्यात; मित्रपक्षाने महायुतीच्या जागावाटपात टाकला खडा
2
"त्या माणसाने आमच्या तोंडावर दरवाजा बंद केला", सुप्रिया सुळेंनी सांगितला वाईट अनुभव
3
हरियाणा विधानसभा निवडणुकीत कास्टिंग काऊच? काँग्रेसच्या महिला नेत्याच्या आरोपाने खळबळ
4
श्रीलंका: दिसानायकेंना राष्ट्रपती पदाने दिली तात्पुरती हुलकावणी; दुसऱ्या राऊंडची मतमोजणी सुरु
5
"मुलाच्या फीससाठी लोकांसमोर हात पसरावे लागले", मनीष सिसोदियांनी सांगितला 'तो' प्रसंग
6
कामगिरी सुधारण्यासाठी पाकिस्तानची वेगळी 'रणनीती', पाकिस्तान क्रिकेट बोर्ड लागले कामाला
7
सावधान! ऑफिस असो किंवा वर्क फ्रॉम होम; सतत खुर्चीवर बसणं खतरनाक, 'या' आजारांचा धोका
8
चंद्राबाबू नायडूंनी TTD वर केलेले आरोप बिनबुडाचे, त्यांच्यावर कारवाई व्हावी, जगनमोहन रेड्डींचं PM मोदींना पत्र 
9
Mamata Banerjee : "पश्चिम बंगालमधील पूर मानवनिर्मित, DVC ने न सांगता सोडलं पाणी"; ममता बॅनर्जींचा गंभीर आरोप
10
इराणच्या कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट; ५१ जणांचा मृत्यू
11
भारताला अमेरिका देणार 31 किलर ड्रोन्स; नरेंद्र मोदी आणि जो बायडेन यांच्यात 'डील डन'
12
सत्ता कुणाचीही येऊ देत, रामदास आठवलेंची जागा पक्की आहे- नितीन गडकरी
13
'यूपीआय'मध्ये मार्केटमध्ये PhonePe सुसाट! Google Pay, Paytm किती मागे?
14
video: दोन लाख रुपये देऊन बिहारचा तरुण बनला 'IPS' अधिकारी; पाहून पोलीसही चक्रावले...
15
"आम्ही कुणालाही सोडणार नाही!’’, तिरुपती लाडू भेसळीप्रकरणी आंध्र प्रदेश सरकार आक्रमक   
16
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोनाचा 'हा' नवा व्हेरिएंट किती खतरनाक, भारताला कितपत धोका?
17
"तुम्हाला दुःख झाले नाही का? देशाला सांगा", केजरीवालांचे मोहन भागवतांना पाच सवाल
18
IND vs BAN : "मला कोणी गिफ्ट दिलं नाही...", 'सामनावीर' अश्विनची मिश्किल प्रतिक्रिया, संघाला जिंकवलं
19
'गोळीला गोळीनेच उत्तर देणार; कलम 370 कधीही मागे घेणार नाही', अमित शाहंची गर्जना...
20
ENG vs AUS ODI : मिचेल स्टार्कचा अप्रतिम यॉर्कर! इंग्लंडचा कर्णधार 'चारीमुंड्या चीत', Video

रेशीम उद्योग व मधमाशी पालनामुळे उत्पादनात वाढ

By admin | Published: March 27, 2016 2:12 AM

रेशीम उद्योग हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त व पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मासिक उत्पन्न मिळण्याची हमी ...

एक दिवसीय कार्यशाळेतील सूरवर्धा : रेशीम उद्योग हा शेतीसाठी अत्यंत उपयुक्त व पूरक व्यवसाय आहे. या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मासिक उत्पन्न मिळण्याची हमी असून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यास योग्य पर्याय आहे. मधमाशी पालनामुळे शेतकऱ्यांच्या दैनंदिन उदरनिर्वाहासाठी मदत होऊ शकते. मधमाशीद्वारे होणाऱ्या पराग सिंचनामुळे पिकांच्या उत्पादनात दुपटीने वाढ होते. शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग व मधमाशी पालन हे व्यवसाय वरदान ठरणारे आहेत, असा सूर कार्यशाळेतील शेती, रेशीम व मधमाशी उद्योग तज्ज्ञांनी काढला. रेशीम उद्योग आणि जैविक कीड व्यवस्थापन केंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर व स्थानिक यशवंत महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ‘एकदिवसीय रेशीम उद्योग व मधमाशी पालन तंत्रज्ञान शेतकरी कार्यशाळा’ घेण्यात आली. रेशीम व मधमाशी उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना याप्रसंगी मार्गदर्शन केले. पहिल्या सत्रात ‘तुतीची लागवड व रोग नियंत्रण’ विषयावर बोलताना रेशीम उद्योग संचालनालयाचे प्रकल्प अधिकारी व्ही.पी. रायसिंग भंडारा यांनी रेशीम उद्योगातील उत्पन्न हे मासिक वेतनासारखे असून रेशमाच्या किड्यांची योग्य काळजी घेतल्यास हा व्यवसाय शेतकऱ्यांना मासिक ५० हजार रुपये मिंळवून देणारा आहे, असे सांगितले. रेशीम उद्योग संचालनालय उपसंचालक डॉ. एस.के. शर्मा म्हणाले की, शेतकऱ्यांनी रेशमाच्या किड्यांचे संगोपन करून कोष विकसित करण्यापूरते मर्यादित न राहता कोष प्रक्रिया उद्योगाकडे वळून आपल्या उत्पादनाचे मार्केटींग केल्यास त्याला अधिक फायदा होऊन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन मिळेल.द्वितीय सत्रात ‘मधमाशी पालन’ विषयावर मधमाशी विकास केंद्र नालवाडीचे संचालक डॉ. गोपाल पालीवाल यांनी पीपीटीद्वारे शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शेतात आंतर पिके घेतल्यास मधमाशा मोठ्या संख्येने आकर्षित होतात व पराग सिंचनाचे कार्य अनेक पटीने वाढून पीक उत्पादनात वाढ होते. मधमाशी पालन व्यवसायाचे प्रशिक्षण प्रत्येक शेतकऱ्यांनी घ्यावे. आपल्या शेतात मधमाशी पालन पेट्या लाऊन त्यांच्या वसाहती निर्माण कराव्यात, असे आवाहनही डॉ. पालिवाल यांनी केले. ‘पराग सिंचन’ विषयावर शिवाजी सायन्स कॉलेज पवनीचे प्रा.डॉ. बी. एस. रहिले यांनी स्वत:चे अनुभव कथन केले. श्रीकांत गजभिये यांच्या मदतीने अनेक शेतकऱ्यांना मधमाशी पालनाचे प्रशिक्षण देऊन अनेक मधमाशी वसाहती वसविल्या. असा प्रयोग वर्धा जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी नागपूर येथील सचिन करडभजने व त्यांच्या सहकाऱ्यांनी मधमाशी पालन व्यवसायाबाबत चित्रफित दाखवित मार्गदर्शन केले. खादीग्रामोद्योगचे गुढे यांनी मधमाशी पालन व्यवसायाबाबत विविध योजनांची माहिती दिली. जिल्हा रेशीम उद्योग अधिकारी व्ही.एम. पौनीकर यांनी शासकीय योजनांबाबत माहिती दिली. दिल्ली येथील केजरीवाल ग्रामसंस्थानचे संचालक योगेश्वरसिंग यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. रेशीम उद्योग शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत रेशीम उद्योगतज्ज्ञ डॉ. एम.एम. राय यांनी वायफड येथे शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन समस्यांचे प्रत्यक्ष निराकरण केले. दोन्ही सत्राला यशवंत ग्रामीण संस्थेचे उपाध्यक्ष सतीश राऊत, संचालक डॉ. किशोर अहेर, प्रतिभा निशाने, मनोहर निशाने, प्राचार्य डॉ. विलास देशमुख, शास्त्रज्ञ प्रा.डॉ. एम.के. राठोड, शेतकरी नेते विजय जावंधिया, बाबासाहेब साळवे, किशोर माथनकर उपस्थित होते. संचालन प्रा. प्रमोद नारायणे व प्रा. चंदनकर यांनी केले तर आभार डॉ. उत्तम पारेकर व डॉ. दिलीप भुगुल यांनी मानले. कार्यशाळेला प्रा. फागसे, प्रा. खान, प्रा. जयश्री काशीकर, प्रा. कावळे, प्रा. पुरुषोत्तम खोब्रागडे, डॉ. बैस आदींनी सहकार्य केले.(कार्यालय प्रतिनिधी)