शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

सिंदी रेल्वे ड्रायपोर्टचे काम मंदावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 6:00 AM

जवळपास ३४ वर्षांपूर्वी स्वीडनच्या डीन इंडिया कंपनीने डेटीनेटर बनविण्याकरिता याच परिसरातील ५३५ एकर जमीन विकत घेतली होती.परंतु मोठा कालावधी लोटला तरीही त्या जागेवर एकही उद्योग उभा न राहिल्याने ती जमीन ३३ वर्षे पडीत राहिली. त्यावर शेतकऱ्यांचा ताबा कायम होता.

ठळक मुद्देदोन वर्षांत केवळ सुरक्षा भिंत : उद्योग उभारणीचा थांगपत्ता नाही

प्रशांत कलोडे।लोकमत न्यूज नेटवर्कसिंदी (रेल्वे) : शहरापासून दोन किलो मीटर अंतरावर जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या माध्यमातून ड्रायपोर्ट उभारण्याच्या कामाला दोन वर्षांपूर्वी सुरुवात करण्यात आली. मात्र, मागील दोन वर्षात केवळ संरक्षण भिंत आणि रेल्वेचा फलाट तयार करण्याशिवाय कोणतेही काम झाले नाही. आताही कामाची गती मंदावलेली असल्याने हा प्रकल्प पूर्ण होणार की नाही, अशीच शंका व्यक्त केली जात आहे.जवळपास ३४ वर्षांपूर्वी स्वीडनच्या डीन इंडिया कंपनीने डेटीनेटर बनविण्याकरिता याच परिसरातील ५३५ एकर जमीन विकत घेतली होती.परंतु मोठा कालावधी लोटला तरीही त्या जागेवर एकही उद्योग उभा न राहिल्याने ती जमीन ३३ वर्षे पडीत राहिली. त्यावर शेतकऱ्यांचा ताबा कायम होता. या जागेवर नवीन उद्योग उभा राहावा याकरिता स्थानिक व जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी मागील २५ वर्षे बरेच प्रयत्न केले पण; प्रबळ इच्छाशक्तीच्या अभावाने त्यांना यश मिळाले नाही. केंद्रात व राज्यात भाजपाची सत्ता आल्याने खासदार रामदास तडस व आमदार समीर कुणावार यांनी पुढाकार घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे तगादा लावला. त्यावेळी ना. गडकरी यांच्याकडे जहाजबांधणी खाते असल्याने त्यांनी जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्यावतीने ३५० एकर जागेवर ड्रायपोर्ट मंजूर केला. शेतकऱ्यांच्या जमिनी संपादीत करुन दोन वर्षापूर्वी कामाचा श्रीगणेशा केला.दोन वर्षात संरक्षण भिंत व फलाटा व्यतिरिक्त दुसरे काम झालेले नाही. विशेषत: २०१९ च्या लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडील जहाजबांधणी खातेही ना. मनसुख मांडवीया यांना देण्यात आले. त्यामुळे आताही प्रकल्प रखडून सिंदीवासीयांना पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ याच अनुभव तर येणार नाही ना? अशीही शंका उपस्थित केली जात आहे.उद्योगाच्या स्वप्नाला अडचणी फारगेल्या ३४ वर्षांपूर्वी येथील शेतकऱ्यांची जमीन स्वीडन डीन इंडिया येथील कंपनीने डेंटिनेटर बनविण्याचा कारख्याण्यासाठी विकत घेतली होती. तेव्हा शेतकऱ्यांना केवळ सहा हजार रुपये एकर दर देण्यात आला होता. कारखाना उभारल्यानंतर ज्यांची जमीन संपादीत केली. त्या शेतकऱ्याच्या परिवारातील एका सदस्याला कारखान्यात नोकरी देण्याचे आश्वासन देण्यात आले होते.त्या कंपनीने संपादीत केलेली जमीन कारखाना उभारणीकरिता सिकॉम या वित्तीय संस्थेकडे गहाण ठेऊन कर्ज घेतले होते.यादरम्यान डॉलरच्या किंमतीत चढउतार झाल्याने कंपनीने कारखाना बनविण्याचा विचार बदलला. कर्जाची परतफेड न केल्याने सिकॉम या वित्तीय संस्थेने जमीन ताब्यात घेऊन नाव चढविले. त्यानंतरही ही जमीन पडीत राहिल्याने शेतकऱ्यांनी आपल्या जमिनी पुन्हा कसायला सुरुवात केली. त्यामुळे शेतकऱ्यांचा ताबा कायम राहिल्याने तेथील ३५० एकर जागा ड्रायपोर्टकरिता संपादित करण्यात आल्याने ताबा असलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा त्या जमिनीचा एकरी सात लाख रुपये मोबदला देण्यात आला. शेतकऱ्यांना दोनवेळा मोबदला मिळाला खर पण; उद्योगाचे स्वप्न साकार होणार की नाही? अशी शंका आहे.गांधी जयंतीदिनी झाले होते भूमिपूजनया ड्रायपोर्ट प्रकल्पाचे भूमिपूजन दोन वर्षांपूर्वी गांधी जयंतीदिनी सेवाग्राम येथून करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या प्रकल्पामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहे. मात्र, मागील दोन वर्षांपासून ज्या गतीने हे काम सुरु आहे त्यामुळे बेरोजगार युवकांसह सिंदीवासीयांच्याही आशा मावळताना दिसत आहे.

टॅग्स :railwayरेल्वे