शहरं
Join us  
Trending Stories
1
सलग दोन स्फोटांनंतर लेबनान 'सावधान'! आता विमान प्रवासात पेजर, वॉकी-टॉकीवर बंदी
2
"इस्रायलने लेबनानमध्ये नरसंहार केला, आता परिणाम भोगा"; हिज्बुल्ला प्रमुखाचा इशारा
3
रशियासोबतची मैत्री तोडण्याचं कटकारस्थान...! युक्रेनला शस्त्रास्त्र पुरवल्याची खोटी बातमी पसरवली; भारतानं सुनावलं
4
तिरुपती मंदिराच्या लाडूंमध्ये जनावरांची चरबी? चंद्राबाबूंनी दिला लॅब रिपोर्टचा हवाला, झाली अशी पुष्टी
5
महायुतीतील ८० टक्के जागावाटप निश्चित, भाजपची १६० च्या जवळपास जागा लढविण्याची भूमिका
6
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये सामील; विधानसभा निवडणूक लढवणार?
7
"लाडकी बहीण' योजनेच्या पैशांचा परिणाम थोडाफार होईल, पण..."; शरद पवारांचे सूचक विधान
8
विरोधी पक्ष राज्याची बदनामी करतायत, लोकसभेतही खोटं बोलून मतं मिळवली, मुख्यमंत्री शिंदे बसरले 
9
अश्विन मार रहा है! चेन्नईच्या चेपॉकवर लोकल बॉय R Ashwinची सेंच्युरी; जड्डूच्या साथीनं रचला नवा इतिहास
10
“...तर आम्ही सर्व २८८ जागांवर लढू, गप्प बसणार नाही”; ठाकरे गटाने काँग्रेसला बजावले
11
"जोपर्यंत अशा महिला आहेत तोपर्यंत...", ग्राहकावर आरोप करत डिलिव्हरी बॉयची मृत्यूला मिठी
12
IREDA बद्दल केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय, DIPAM ने दिली मंजूरी; शेअर तेजीत
13
CM शिंदेंसमोरच अजित पवारांनी गायकवाडांचे टोचले कान; म्हणाले, "वाचाळवीरांनी..."
14
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: साडेसाती कशी येते? ‘शनी’ला आहे एक विशेषाधिकार; पाहा, प्रभावी मंत्र अन् उपाय
15
शाळा-कॉलेजांमध्ये मोबाईल फोन आणण्यावर पूर्ण बंदी; 'या' देशातील सत्ताधाऱ्यांचा नवा आदेश
16
Video - "तुमच्याकडे ऐकून घेण्याची क्षमता नाही"; वर्षा उसगांवकरांविरोधात धनंजयने ठोकला शड्डू
17
पन्नू प्रकरणात अमेरिकेचे भारत सरकारला समन; आता परराष्ट्र मंत्रालयाने दिले जोरदार प्रत्युत्तर...
18
ऋषभ पंतनं लगावला गुंतवणुकीचा 'षटकार', एकाच कंपनीत लावले ₹7.40 कोटी; क्रिकेटच्या भाषेत समजावलं गणित 
19
कॅनडामध्ये शिकायला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी कामाची बातमी! सरकारचा मोठा निर्णय
20
नंदुरबारमध्ये तणाव; जाळपोळ, दगडफेक रोखण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधूर

विदर्भाची लेक... हजारोंची माय, सिंधूताई सपकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2022 10:34 AM

सिंधूताईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) येथे झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुराखी होते. तर त्यांचे सासर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या नवरगाव हे आहे.

ठळक मुद्देविदर्भकन्येच्या निधनाने वर्धा, चिखलदऱ्या शोककळा

वर्धा : अनाथांची माय म्हणून देशभरात ओळखल्या जाणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांचे मंगळवारी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. आपल्या कार्याचा ठसा जनमानसात उमटविणाऱ्या माईंचा जन्म विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील नवरगाव येथे झाला होता. त्यांच्या निधनाने संपूर्ण विदर्भ हळहळला आहे. 

जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात सिंधूताई सपकाळ यांचा वर्धा जिल्ह्याशी अंत्यंत जवळचा ऋणानुबंध राहिला आहे. सिंधूताईचा जन्म १४ नोव्हेंबर १९४७ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या पिपरी (मेघे) येथे झाला. त्यांचे वडील अभिमान साठे हे गुराखी होते. तर त्यांचे सासर वर्धा जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या नवरगाव हे आहे.

वयाच्या १० व्या वर्षी त्यांचा विवाह श्रीहरी सपकाळ यांच्यासोबत झाला. त्यानंतर त्यांनी पतीचे घर सोडले व त्यानंतर त्या अनेककाळ संघर्षमय जीवन जगल्या. वर्धा जिल्ह्यात त्यांनी गोपिका गाईरक्षण केंद्र व विविध सामाजिक संस्था सुरू केल्या. त्या माध्यमातून समाजातील शोषित पीडित नागरिकांना दिलासा देण्याचे काम केले जात आहे. अलिकडेच त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविद यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. यावेळी वर्धा वासियांच्यावतीने त्यांच्या  विविध सामाजिक संघटनांनी सत्कारही केला.

मी वनवासी हे त्यांचे आत्मचरित्र गाजले होते. त्यावर आधारित चित्रपटही निघाला होता. चिखलदरा व्याघ्र प्रकल्पात गवळी लोकांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी आंदोलने केले. रामू पटेल हे वन राज्यमंत्री असताना त्यांना या आंदोलनाची दखल घ्यावी लागली होती. चिखलदऱ्याजवळील शहापूर येथे त्यांचे वास्तव्य होते. ममता बाल सदन, वर्धेतील गोशाळेच्या माध्यमातून त्यांचे कार्य अविरत सुरू होते. त्यांच्या मागे अमृत, अरुण, संजय, ममता ही मुले मुली आणि एक दत्तक मुलगा दीपक आणि अनाथांचा मोठा परिवार आहे.

टॅग्स :Sindhu Tai Sapkalसिंधुताई सपकाळVidarbhaविदर्भ