रस्ते झाले मोकळे : वाहतुकीची समस्या निकाली निघणार तळेगाव (टा.) : येथे मुख्य मार्गावरील अतिक्रमण हटविण्याची मोहीम गुरुवारी प्रारंभ झाली. सदर मोहीम शुक्रवारीही सुरूच होती. ती तीन दिवस चालणार आहे. या कार्यवाहीत अनेकांनी अतिक्रमण करून बांधलेली घरे व दुकाने पाडण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी या अतिक्रमणाला विरोध केला नाही. मात्र या कार्यवाहीत ज्यांची घरे पडली त्यांच्या डोळ्यात अश्रु तरळताना दिसले. दोन वर्षांपूर्वी या मार्गाचे मोजमाप झाले. अतिक्रमणधारकांना नोटीस बजावली. मात्र अतिक्रमण काढले नाही. त्यामुळे दोन वर्षानंतर प्रशासनाने तीन बुलडोजरच्या साह्याने पोलीस बंदोबस्तात ही मोहीम राबविली. झालेल्या तोडफोडीमुळे अनेकांच्या घरासमोर मलबा साचला आहे. अतिक्रमधारकांनी हा मलबा उचलण्याला विरोध केला. काही दिवसांनी मलबा उचलण्यात यावा अशी मागणी केली. अतिक्रमण काढताना काहींच्या घराचे मोठे नुकसान झाल्याने उपस्थितांनी हळहळ व्यक्त केली. शुक्रवारला राबविण्यात येणाऱ्या अतिक्रमण हटाव मोहिमेत पडलेले विटा व साहित्य उचलण्यासाठी आम्हाला वेळ द्यावा, अशी मागणी या मागणीला अधिकाऱ्याने दुजोरा दिल्याने ही मोहीम समोर ढकलल्याचे समजते. गावातील रस्ते मोकळा श्वास घेत आहे.(वार्ताहर)
एका दिवसातच गाव झाले भकास
By admin | Published: March 18, 2017 1:11 AM