लोकमत न्यूज नेटवर्कदिलीप चव्हाणवर्धा: सेवाग्राम आश्रमात राहताना म. गांधीजी ज्या चटया वापरत होते त्यांची देखभाल येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूमताई पांडे या स्वत: जातीने करीत अशतात. वर्धा व सेवाग्रामसह विदर्भाच्या अनेक भागात आढळणाऱ्या शिंदोळ्याच्या झाडांच्या पानोळ्यापासून या चटया बनविल्या जात असत. आता ती झाडेही कुठे आढळत नाहीत. या पानोळ्यापासून चटया, आसनपट्ट्या व आसने बनविली जात. त्यावेळी शिंदोळ्याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असे. अतिशय मजबूत व लवचिक अशा या पानोळ्याची बनविलेली ही आसने आजही येथे आपल्या सांस्कृतिक वारशाची साक्ष देत आहेत.त्यांची नियमित देखभाल करण्याची जबाबदारी कुसूमताई पांडे या स्वत: पार पाडतात. अलीकडेच त्यांनी या चटयांची दुरुस्तीही केली. सेवाग्राम येथील आक्षमात अशा अनेकविध वस्तू व बाबी साध्या राहणीचे व तत्कालीन संस्कृतीचे जतन करत आहेत.
सेवाग्राम आश्रमात आजही जपल्या जातात गांधीजींच्या काळातील शिंदोळ्याच्या चटया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2018 2:09 PM
सेवाग्राम आश्रमात राहताना म. गांधीजी ज्या चटया वापरत होते त्यांची देखभाल येथील ज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूमताई पांडे या स्वत: जातीने करीत अशतात.
ठळक मुद्देज्येष्ठ कार्यकर्त्या कुसूमताई पांडे करतात निगुतीने देखभाल