लोकमत न्यूज नेटवर्कआकोली : नजिकच्या माळेगाव ठेका येथील राजू बत्तीसराव सपकाळ यांनी मसाळा या गावात संजय हरबाजी सपकाळ यांच्याकडून इमला विकत घेतला. त्या घरी ते राहायला गेले पण मागील ९ महिन्यांपासून इमला कर पावती त्यांच्या नावाने करुन दिली नाही. परिणामी राजू सपकाळ यांचे मानसिक संतुलन ढासळले असून ते विमनस्क अवस्थेत आहे.राजू सपकाळ व संजय सपकाळ यांच्यात नातेसंबंध असून संजय यांचेकडून राजू यांनी २६ एप्रिल २०१८ रोजी सहा लाख रुपयात राहत्या जागेसह इमला विकत घेतला. तेव्हापासून ते कुटुंबीयांसह त्या घरात राहत आहे. पुर्वी या जागेची कर पावती संजय सपकाळ यांच्या नावाने होती. पण आता या जागेचा ताबा राजू सपकाळ यांच्याकडे असून त्यांनी स्वत:च्या नावाने इमला कर देण्याबाबत वारंवार विनंती केली. तसेच आवश्यक कागदपत्रेही ग्रामपंचायतला पुरविली. त्यासोबतच अनेकदा ग्रामपंचायत कार्यालयाचे उंबरठे झिजविले, तरीही त्याना न्याय मिळला नसल्याचा आरोप सपकाळ कुटूबियांकडून करण्यात आला आहे. सहा लाख रुपये गेले, सर्व कागदपत्रांची पुर्तता केली तरीही ग्रामपंचायतकडून त्यांच्या नावाची कर पावती मिळाली नाही. याबाबत ग्रामसेवकांशी संपर्क साधाला असता त्यांचा भ्रमणध्वनी कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर असल्याचे सांगत होता.