लोकमत न्यूज नेटवर्क वर्धा : मागील वर्षभरापासून बाजारपेठेत एसयूव्ही कारच्या विक्रीत वाढ झालेली आहे. तसेच या सेंगमेंटमध्ये अनेक विभा आणि नवीन मॉडेल्स आल्यामुळे स्पर्धा आणखीच वाढली आहे. नुकतीच पंचची एसयूव्ही कार ही सर्वाधिक विक्री होणारी कार ठरली आहे. किमती वाढूनही एसयूव्ही कारच्या मागणीत घट झालेली नाही. उलट या कारसाठी नोंदणी वाढली असून कारसाठी सहा ते सात महिने वेटिंगवर राहण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे.
प्रत्येकाचे स्वप्न असे की आपलीही स्वतःची कार असावी. ज्या कारमधून आपण कुटुंबासह फिरायला जाऊ. ऐटीत राहू अशी इच्छा असतात. त्यामुळे थोडाफार पैसा जमा झाला की नागरिक कार खरेदीकडे वळतात. जिल्ह्यात चारचाकी वाहनधारकांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे अनेकदा कारची नोंदणी केल्यावर सहा ते सात महिन्यांनी ग्राहकांना प्रत्यक्षात कार मिळत आहे. सोयी, सुविधा अन् दर्जा चांगला मिळत असल्याने ग्राहकही वेटिंगवर राहून पसंतीची कार खरेदी करताना दिसून येत आहे.
एसयूव्हीसाठी किमान ६ महिने वेटिंग
- टाटा नेक्सॉन, मारुती ब्रेझा आणि डूंडाई क्रेटा यासारख्या एसयूव्ही कारही बाजारात आहेत. त्यात टाटा पंचचीही भर पडली आहे. या नवीन एसयूव्ही गाड्यांना चांगली मागणी आहे.
- एसयूव्ही कारला मायलेज चांगले असल्याने ग्राहकांची पसंती आहे. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी बुकिंग करावी लागते.
म्हणून वाढली एसयूव्हीला मागणी एसयूव्ही स्पोर्टी लूक आहे. या वाहनांची वैशिष्ट्ये म्हणजे हे वाहन खडबडीत रस्त्यावरुनही व्यवस्थित चालते. या कारला फॅमिली कार देखील म्हणतात. या वाहनात भरपूर स्पेस असून यात चांगले ग्राउंड क्लिअरन्स आणि पॉवरही असल्याने मागणी वाढत आहे.
महागड्या एसयूव्हीला मागणी जास्त स्पोर्ट युटिलिटी हे कारचे वर्गीकरण आहे. एसयूव्ही कार प्रवासी आणि ऑफ रोड कारचे एकत्र रूप आहे कारची ओबडधोबड रस्त्यावर धावण्याची क्षमता अधिक असते. या कारचा वापर ग्रामीण भागातही होतो. जिल्ह्यात ग्राहकांकडून एसयूव्ही कारला अधिक मागणी वाढत आहे. त्यामुळे कार खरेदी करायचे म्हटले तर पाच महिने अधिक बुकिंग करावी लागते.
जिल्ह्यात एसयूव्हीची विक्री वाढली ग्रामीण भागातही चारचाकी वाहनधारकांच्या संख्येत वाढ होत आहे. बाजारपेठेत वेगवेगळ्या कार उपलब्ध असून त्यात अधिक प्रमाणात एसयूव्ही या प्रकारातील कारला ग्राहकांची मागणी आहे. एसयूव्ही कार विक्रीची संख्या मागच्या वर्षीच्या तुलनेत अधिक वाढली आहे.
एसयूव्ही कार १० लाखांपासून पुढे
- एसयूव्ही कारची मागणी वाढली आहे. सरासरी नऊ लाखांपासून या कारच्या किमती सुरू होतात.
- यातही वेगवेगळ्या कंपनीच्या चांगल्या गुणवत्तेच्या कार असल्याने किमतीत कमी अधिक फरक दिसून येतो.
- एसयूव्ही कारने सध्या ग्राहकांना भुरळ घातल्याने इतर कारच्या तुलनेत याची विक्रीही वाढलेली आहे.