शहरं
Join us  
Trending Stories
1
अखिलेश यादवांचा 'मविआ'ला इशारा, म्हणाले, "आम्हाला आघाडीत घेतलं नाही, तर..."
2
शिवडीतील नाराजीनाट्य संपलं; अजय चौधरी आणि सुधीर साळवी आले एकत्र
3
किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
4
जयश्री थोरात यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य, विखे समर्थक वसंतराव देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात
5
अजित पवार गटाची तिसरी यादी जाहीर; निलेश लंकेंच्या पत्नीविरोधातील उमेदवार ठरला
6
"काँग्रेसने १०० जागा लढवल्या तर आम्हाला...’’, संजय राऊत यांनी स्पष्टच सांगिलतं
7
"देश अक्षम्य रेल्वे मंत्र्यांच्या हाताखाली"; वांद्रे टर्मिनसवरील चेंगराचेंगरीनंतर मविआ नेत्यांचा संताप
8
चैतन्याचा उत्सव… दीपावलीचे दिवस आणि मुहूर्त जाणून घ्या...
9
मुंबईतील वांद्रे टर्मिनसवर चेंगराचेंगरी, ९ जण जखमी, दोघांची प्रकृती चिंताजनक
10
‘काहीच उरत नाही’, हीच गरिबांची कहाणी; राहुल गांधींनी शेअर केला व्हिडीओ
11
जुन्नर विधानसभेसाठी समन्वय साधण्याचा प्रयत्न केला, पण एका व्यक्तीमुळे...; अतुल बेनकेंचा कोल्हेंवर आरोप
12
वसंतराव देशमुखांच्या अटकेसाठी पोलीस ठाण्यासमोर आठ तास आंदोलन; जयश्री थोरातांवर गुन्हा दाखल
13
अमित ठाकरेंना भाजपकडून समर्थन; सदा सरवणकर कार्यकर्त्यांना म्हणाले, "वाटेल त्या परिस्थितीत..."
14
काँग्रेसचा उमेदवार जाहीर होताच कोल्हापुरात राडा, कार्यालयावर दगडफेक, भिंतीवर लिहिलं चव्हाण पॅटर्न
15
लाेकशाही, न्यायासाठी लढणे हाच माझ्या जीवनाचा पाया : प्रियांका गांधी
16
बीडमधून संदीप क्षीरसागर, फलटणमधून दीपक चव्हाण; शरद पवार गटाकडून २२ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर
17
तीन सख्खे भाऊ दुसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात; नंदुरबारातून विजयकुमार, शहाद्यातून राजेंद्रकुमार, नवापुरातून शरद गावित 
18
इस्राइलने मोडले इराणच्या बॅलेस्टिक मिसाईल प्रोग्रॅमचे कंबरडे, अचूक हल्ल्यात प्लँट नष्ट
19
नवे चेहरे, नेत्यांचे नातेवाईकही... काँग्रेसच्या एकाच दिवशी दोन याद्या; आतापर्यंत ८७ उमेदवार जाहीर
20
Vidya Balan: 'भूल भुलैय्या 2' साठी विद्या बालनने का दिला होता नकार? स्वत:च केला खुलासा

सहा व्यावसायिकांना ठोठावला २६ हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2018 10:27 PM

कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा वापर करताना आढळल्याने शहरातील सहा व्यावसायिकांवर न.प.च्या विशेष पथकाने दंडात्मक कारवाई केली. या व्यावसायिकांकडून एकूण २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देन.प.ची कारवाई : कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर भोवला

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांच्या वापरावर बंदी असताना त्याचा वापर करताना आढळल्याने शहरातील सहा व्यावसायिकांवर न.प.च्या विशेष पथकाने दंडात्मक कारवाई केली. या व्यावसायिकांकडून एकूण २६ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.प्लास्टिक बंदीची प्रभावी अंमलबजावणी सध्या न.प.च्या आरोग्य विभागाकडून केली जात आहे. त्यासाठी न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांची विशेष चमु तयार करण्यात आली आहे. या चमुने शहरातील न्यू डायमंड सेल, कृपा हॉटेल, कविता ट्रेडर्स, श्याम रेस्टॉरेंट, बिकानेर हॉटेल, चाट भंडार या व्यावसायिक प्रतिष्ठानांवर छापा टाकून तेथील स्वच्छतेची पाहणी करीत तेथे कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर होत आहे काय? याची शहानिशा केली. सदर व्यावसायिक प्रतिष्ठानांमध्ये कमी जाडीच्या प्लास्टिकचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याने न्यू डायमंड सेल, कृपा हॉटेल, कविता ट्रेडर्स, श्याम रेस्टॉरेंट, बिकानेर हॉटेलच्या मालकाला प्रत्येकी पाच हजार रुपये दंड ठोठावला तसेच चाट भंडार या व्यावसायिक प्रतिष्ठानाला एक हजाराचा दंड असा एकूण २६ हजारांचा दंड ठोठावून त्याची वसूली केली. शिवाय या कारवाईदरम्यान न.प. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुमारे ६० किलो कमी जाडीचे प्लास्टिक जप्त केले. ही कारवाई न.प. मुख्याधिकारी अश्विनी वाघमळे, न.प. प्रशासकीय अधिकारी किशोर साखरकर, आरोग्य विभाग प्रमुख प्रविण बोरकर यांच्या मार्गदर्शनात अशोक ठाकूर, विशाल सोमवंशी, सतीश पडोळे, नवीन गोंदेकर, गुरूदेव हटवार, स्रेहा मेश्राम, लंकेश गोंदेकर, मनिष मानकर यांनी केली.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी