लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थ्याला तेथीलच शिक्षकाने क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे. याप्रकरणी विद्यार्थ्याच्या पालकाने रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली आहे.पवन सुनील सोनटक्के नामक मुलगा केंद्रीय विद्यालयात सहावीचे शिक्षण घेत आहे. बुधवारी पवन हा शाळेत पोहोचला असता केंद्रीय विद्यालयात कार्यरत असलेल्या सालोडकर नामक शिक्षकाने त्याला क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. यात पवनच्या डोळ्याला, पाठीवर व कंबरेवर इजा झाल्या. शिक्षकाच्या हे रुप पाहून उपस्थित विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.घटनेची माहिती पवनच्या कुटुंबियांना मिळताच त्यांनी मारहाण करणाºया शिक्षकाच्या विरोधात कठोर कार्यवाही करण्याच्या मागणीची लेखी तक्रार शाळा व्यवस्थापन समितीकडे सादर केली. या घटनेमुळे शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये दहशतीचे वातावरण तयार झाले असून दोषी शिक्षकावर काय कार्यवाही होते याकडे साºयांचे लक्ष लागले आहे.अवघ्या दीड तासात शिक्षकाला मेमोविद्यार्थ्याला मारहाण करणारा शिक्षक सालोडकर याला विद्यार्थ्यांच्या पालकाची तक्रार प्राप्त होताच केंद्रीय विद्यालयाच्यावतीने अवघ्या दीड तासातच नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. शिक्षकाला नोटीस बजावण्यात आला असला तरी त्याच्यावर काय कारवाई होते याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.अहवाल होणार वरिष्ठांना सादरसहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून अमानुष मारहाण करण्यात आल्याने पुन्हा एकदा हिंदी विद्यापीठाच्या परिसरातील केंद्रीय विद्यालयाच्या मनमर्जी कारभाराबाबत नागरिकांकडून उलट-सुटल चर्चा केली जात आहे. शुक्रवारी या प्रकरणी सुमारे सहा विद्यार्थ्यांचे बयान नोंदविण्यात आले असून चौकशीअंती अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात येणार आहे.सहा विद्यार्थ्यांचे नोंदविले बयानशिक्षकाकडून विद्यार्थ्यांला मारहाण केल्याप्रकरणी शुक्रवारी प्रभारी मुख्याध्यापक अजय नासरे यांनी सुमारे सहा विद्यार्थ्यांचे बयान नोंदवून घेतले.विद्यार्थ्यांना मारहाण करणे ही बाब निंदनीय आहे. सदर घटनेची लेखी तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. त्या आधारे संबंधित शिक्षकाला नोटीस बजावण्यात आला आहे. शिवाय आज काही विद्यार्थ्यांचे बयान नोंदविण्यात आले आहे. या प्रकाराची चौकशी करून योग्य कारवाई करण्यात येईल.- अजय नासरे, प्रभारी मुख्याध्यापक, केंद्रीय विद्यालय वर्धा.
सहावीच्या विद्यार्थ्याला शिक्षकाकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2017 12:02 AM
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठाच्या परिसरात असलेल्या केंद्रीय विद्यालयातील सहावीच्या विद्यार्थ्याला तेथीलच शिक्षकाने क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केल्याची घटना उजेडात आली आहे.
ठळक मुद्देकारवाईची मागणी : केंद्रीय विद्यालयातील प्रकार