शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
2
भाजपच्या मंत्र्यानं अजान ऐकून थांबवलं भाषण; मंचावरूनच पठण केलं, ‘ला इलाहा इल्लल्लाह…’ 
3
अदानी समूहावर आरोप म्हणजे भारताचा विकासरथ रोखण्याचं षडयंत्र; महेश जेठमलानी बचावासाठी मैदानात
4
२८ चेंडूत १०० धावा! IPL मधील Unsold गड्यानं फास्टर सेंच्युरीसह मोडला रिषभ पंतचा रेकॉर्ड
5
‘इस्कॉन कट्टरतावादी संघटना’, बांगलादेशमधील युनूस सरकारकडून बंदी घालण्याची तयारी  
6
"बाळा, मीच तुझी मम्मा..."; मेकअप केलेल्या आईला ओळखू शकला नाही लेक, ढसाढसा रडला
7
भाजपाने जे ठाकरेंसोबत केले, तसेच आता शिंदेंशी वागतायत का? शिंदे गटाचे नेते म्हणाले...
8
धक्कादायक! महाराष्ट्रातील 'या' मतदारसंघात एका बूथवरील मतमोजणी झालीच नाही
9
एकनाथ शिंदे यांची दुपारी ३ वाजता पत्रकार परिषद, मोठा निर्णय जाहीर करणार? 
10
लग्नाचं आमिष दाखवून केलं शोषण, 'पुष्पा 2'मधील अभिनेत्याविरोधात FIR दाखल
11
'बांगलादेशच्या स्वातंत्र्याला धोका...', चिन्मय दास यांच्या अटकेनंतर भारताची तीव्र प्रतिक्रिया; बांगलादेश म्हणाला...
12
मुख्यमंत्री कोण होणार? लवकरच उत्तर मिळेल; देवेंद्र फडणवीसांचे सूचक वक्तव्य
13
काय आहे 'वन नेशन, वन सबस्क्रिप्शन' योजना, कोणाला होणार फायदा?
14
IPL Auction 2025: धडामsss ! मॅक्सवेल ते स्टार्क… ‘या’ ५ बड्या खेळाडूंचा भाव ‘धाडकन्’ कोसळला..!!
15
Enviro Infra Engineers IPO Allotment : एन्व्हायरो इन्फ्रा IPO चं अलॉटमेंट झालीये का? कसं चेक कराल, जाणून घ्या 
16
IRCTC ची ब्लॅक फ्रायडे ऑफर, स्वस्तात मिळेल फ्लाइट तिकीट आणि 'ही' सुविधा...
17
६ बहिणींचं लग्न, ४ भावांचं शिक्षण; अपघातात मृत्यू झालेल्या डॉक्टरची डोळे पाणावणारी गोष्ट
18
'सर्वात मोठा पक्ष कोणताही असेल, मुख्यमंत्री तुम्हीच होणार'; निवडणुकीपूर्वी भाजपाने शिंदे शिवसेनेला शब्द दिलेला?
19
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
20
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"

खडकी-किन्हाळा रस्त्यावरील ४० झाडांची कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 11:57 PM

सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीमधील खडकी-किन्हाळा-अंतोरा या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरव्या उभ्या ४० बाभुळ लिलाव न करताच कापण्यात आल्या आहे.

ठळक मुद्देशासनाला २ लाखांचा चुना : कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी (शहीद) : सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या हद्दीमधील खडकी-किन्हाळा-अंतोरा या रस्त्याच्या दोन्ही बाजूच्या हिरव्या उभ्या ४० बाभुळ लिलाव न करताच कापण्यात आल्या आहे. याप्रकरणी उपविभागीय अभियंत्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आशिष वाघ यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केली आहे.खडकी-किन्हाळा रस्त्यावर अनेक वर्षांपासून डौलदार हिरव्याकंच बाभुळ होत्या. रस्त्याच्या दुतर्फा व बाभळीचे हिरवेगार नंदनवन बहरले होते. त्यापासून कुठलाही धोका नव्हता. मात्र काही दिवसांपूर्वी चार पाच लोक आले त्यांनी यंत्राच्या सहाय्याने मोठमोठ्या बाभुळ कापून वाहनाद्वारे भरून विल्हेवाट लावली. याची माहिती मिळताच स्वाभिमानीचे आशिष वाघ घटनास्थळी पोहचले. त्यांनी वृक्षकटाई करणाऱ्या मजूरांना विचारले असता त्यांनी उपविभागीय अभियंता विवेक पेंढे यांनी झाडे कापा अशी रेकॉर्डींग ऐकविली त्यामुळे वाघ चांगलेच अचंबित झाले.लागलीच याप्रकरणी कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांना चित्रीकरण व छायाचित्र पाठविले या रस्त्यावर काही बाभळीचा कापलेला माल पडून आहे.गेल्या ३ वर्षांमध्ये आष्टी उपविभागात उपविभागीय अभियंत्याने रस्त्यावरील जवळपास सर्वच बाभुळ कापून नष्ट केला आहे. शासनाचेच अधिकारी शासनाला लाकूड तोडीच्या कामात चुना लावत असल्याने वृक्ष चोरट्यांचे फावल्या जात आहे. याप्रकरणी उपविभागीय अभियंता पेंढे यांना विचारले असता त्यांनी अज्ञात इसमाच्या नावे पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचे सांगितले. पोलिसांनी अद्यापही कुणावार कारवाई केली नाही. हे विशेष.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभाग