लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : अवघड असलेले कार्य साध्य करून पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडाची चिकाटी ही स्तुत्य आहे. ५० टक्के जंगल नष्ट झाल्याची खंत व्यक्त करीत काही समाजसेवी संस्था पूढे येऊन वृक्षांची लागवड करीत आहे. वृक्ष लागवड करीत असताना वृक्ष लागवड समाजासाठी हितकारक ठरेल, असे मत मराठी साहित्य क्षेत्रातील ज्येष्ठ साहित्यिक व वन्यजीव अभ्यासक, लेखक मारोती चितमपल्ली यांनी व्यक्त केले.जनहित मंचचा पाचवा वर्धापन दिन सोहळा ‘मुक्तांगण’ आदिवासी वसतिगृहासमोर आयटीआय टेकडी उमरी (मेघे) येथे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अध्यक्षतेत पार पडला. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जनहित मंचचे अध्यक्ष सतीश बावसे, सचिव डॉ. राजेश आसमवार, उपाध्यक्ष सुभाष पाटणकर आदी उपस्थित होते.मारूती चितमपल्ली पूढे म्हणाले की, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड आवश्यक आहे. आज चिमण्या, कावळे व घारी हे पक्षी नाहीसे झाले आहेत. सापांना ठार मारले जाते. सापांना मारू नका, निसर्गाचे संरक्षण करण्यासाठी कढीपत्ता व शेवग्याच्या शेंगांची झाडे लावा. मधमाशा पालन करा. नदी, नाल्यांच्या बाजूला उंबराची झाडे लावा. ती झाडे पाण्याची पातळी वर आणते. शेतात बांध घातले पाहिजे. चारोळीची झाडे लावा. ते एक उत्पन्नाचे साधन होईल. ताड, चिंच, खजुर, सिंदीचे झाडे लावल्याने समाजाला त्याचा उपयोग होईल. पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडीची चिकाटी स्तुत्य आहे.जिल्हाधिकारी नवाल म्हणाले की, जनहित मंचने निर्माण केलेला हा परिसर खºया अर्थाने वर्धेकरांसाठी मुक्त आंगण म्हणून उदयास येत आहे. मुक्तांगणात बहरलेले फुल पाहताना तुमच्या परिश्रमाने रंग आणला. कोणतेही कार्य करताना स्वत:चे समर्पण असेल तर त्याचे महत्त्व मोठे असते. मुक्तांगण हे एक मॉडेल ठरू शकते. शिक्षण प्रणालीमध्ये थोडा बदल करून त्या शिक्षणासोबत वृक्षारोपण, स्वच्छता, वृद्धांचा सन्मान असे सामाजिक मुद्दे घेऊन विद्यार्थ्यांत संस्कारयुक्त शिक्षणाचा समावेश गरजेचा आहे. सामाजिक परिवर्तनास्तव संस्कारयुक्त बालक घडविण्याचा प्रयत्न विविध स्वयंसेवी संस्थांनी करावा. हे शास्वत विकासासाठी उपयोगी, प्रेरणादायी ठरेल. सर्वांनी सकारात्मक कार्य केल्यास बदल निश्चित घडून येऊ शकतो, असा विश्वास व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश बावसे यांनी केले तर मुक्तांगणची वाटचाल डॉ. राजेश आसमवार यांनी विषद केली. संचालन सुभाष पाटणकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार डॉ. जयंत मकरंदे यांनी मानले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मुरलीधर बेलखोडे, डॉ. तारक काटे, डॉ. अरुण पावडे, डॉ. सचिन पावडे, भोयर, कौशल मिश्रा, अविनाश सातव, सुनील सावध, प्रा. शेख हाशम यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाकरिता जनहित मंचचे सर्व सदस्य, पदाधिकारी व नागरिकांनी सहकार्य केले.जनहित मंचच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यातील ‘मुक्तांगण’ला सहकार्य करणाºया मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यात बजाज फाऊंडेशनचे महेंद्र फाटे, आदिवासी वसतिगृहाचे किशोर रहाटे, अरविंद पवार व अमेरिका स्थित डॉ. सुरूची गालकर यांचा मानपत्र देत मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
समाजोपयोगी वृक्ष लागवड हितकारक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 11, 2017 1:12 AM
अवघड असलेले कार्य साध्य करून पर्यावरणाच्या दृष्टीने वृक्ष लागवडाची चिकाटी ही स्तुत्य आहे. ५० टक्के जंगल नष्ट झाल्याची खंत व्यक्त करीत काही समाजसेवी संस्था पूढे येऊन वृक्षांची लागवड करीत आहे.
ठळक मुद्देमारूती चितमपल्ली : जनहित मंचचा पाचवा वर्धापन दिन सोहळा