महेश सायखेडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी जगभरात साजरी करण्यात येत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील दुर्बल आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांकरिता असलेल्या विकास योजनांची माहिती त्यांना व्हावी याकरिता ८ एप्रिलपासून राज्यात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचा निर्णय शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने घेतला आहे.हा सप्ताह साजरा करण्यासाठी सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना २ लाख तर प्रादेशिक स्तरावरील संबंधीत सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांना ३ लाख रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. हा निधी त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ उपलब्ध करून देण्याच्या सूचना आहेत. या सप्ताहातील सहा दिवसात राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाºया योजनांची माहिती गरजू घटकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी समाज कल्याणसह सामाजिक संस्थांना दिली आहे.डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानात समाजातील दुर्बल वंचितांबाबत राज्याची जबाबदारी अत्यंत दुरदर्शीपणे व गांभीर्याने नमुद केली आहे. कलम ४६ मध्ये ‘राज्य हे दुर्बलतर जनवर्ग आणि विशेषत: अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे विशेष काळजीपूर्वक शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन करील आणि सामाजिक अन्यायावर सर्वप्रकारचे शोषण या पासून त्यांचे सरंक्षण करील’, असे नमूद आहे. या कलमाचा अंमल करण्याकरिता शासनाच्यावतीने हा सामाजिक समता सप्ताह साजरा करण्याचा निर्णय आहे.राज्यात एकाच वेळी उद्घाटन८ एप्रिलपासून राज्यभर सुरू होणाºया या सामाजिक सप्ताहाचे एकाच वेळी उद्घाटन करण्याच्या सूचना शासनाच्यावतीने देण्यात आल्या आहे. या सप्ताहात जिल्ह्यातील सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत असलेल्या सर्व महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक व जिल्ह्याचे माहिती अधिकारी यांना सदर कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने सामावून घ्यावे, याकरिता जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी सर्व शासकीय अधिकारी सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी यांना निमंत्रीत करण्यात येणार आहे. या सप्ताहात विद्यार्थ्यांसह दुर्बल घटकांच्या विकासाकरिता असलेल्या सर्वच योजनांची माहिती देण्याचा प्रयत्न सामाजिक न्याय विभागाने करणे अनिवार्य आहे.सप्ताहातील प्रत्येक दिवशी कोणते कार्यक्रम घ्यावे याच्या सूचना संबंधीत विभागांना शासनाकडून करण्यात आल्या आहे. यानुसार हा सप्ताह साजरा होईल अशी अपेक्षा सामाजिक न्याय विशेष सहाय्य विभागाने व्यक्त केली आहे.
दुर्बलांच्या विकास योजनांच्या जनजागृतीसाठी सामाजिक समता सप्ताह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2018 12:21 AM
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती १४ एप्रिल रोजी जगभरात साजरी करण्यात येत आहे. या जयंतीनिमित्त राज्यातील दुर्बल आणि अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील नागरिकांकरिता .....
ठळक मुद्दे८ ते १४ एप्रिल दरम्यान विविध कार्यक्रम : सहआयुक्तांना दोन तर प्रादेशिक आयुक्तांना मिळणार तीन लाख