लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत देवळी तालुक्यातील कवठा (रेल्वे) ग्रामपंचायत येथील कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गटांना राजस्थानातील डुंगरपूर येथील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजॉली प्राईवेट लिमिटेड ‘दुर्गा एनर्जी’ या ठिकाणी दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.सोलर पॅनल निर्मिती व सोलर घरगुती उपयोगी लायटींग सिस्टीम असेम्बल व इन्स्टालेशन प्रशिक्षणा करिता जिल्हास्तरावरून महिलांना पाठविण्यात आले. आयआयटी मुंबई व दुर्गा एनर्जी अंतर्गत कार्यरत महिला यांच्याद्वारे प्रशिक्षण पूर्ण करून महिला योग्य पद्धतीने सोलर पॅनल युनिट तयार करण्याचे काम कवठा (झोपडी) येथे सुरू करणार आहेत.याकरिता जिल्हा व्यवस्थापक मार्केटींग मनीष कावडे, तालुका व्यवस्थापक गोपाल साबळे, प्रभाग समन्वयक किशोर कोल्हे यांचे गावस्तरावर अभियानाद्वारे सहकार्य लाभले आहे. कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गट यांच्याद्वारे निर्मित होणाऱ्या सोलर पॅनल युनिट तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पाला जिल्हा नियोजन समिती ,जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांच्या अथक प्रयत्नाने मूर्त स्वरूप देण्यात आले आहे. तसेच मुख्यकार्यकारी अधिकारी अजय गुल्हाणे, प्रकल्प संचालक विवेक इलमे, जिल्हा अभियान व्यवस्थापक देवकुमार कांबळे, तालुका अभियान व्यवस्थापक ओमलता दरणे यांचे मार्गदर्शन या महिलांना लाभत आहे.
कवठा येथील महिलांना डुंगरपूर राजस्थान येथे सौर ऊर्जा प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 10:17 PM
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान यांच्या अंतर्गत देवळी तालुक्यातील कवठा (रेल्वे) ग्रामपंचायत येथील कवठा (झोपडी) गावातील चेतना ग्रामसंघातील २१ स्वयं साहयता गटांना राजस्थानातील डुंगरपूर येथील रिन्यूएबल एनर्जी टेक्नॉलॉजॉली प्राईवेट लिमिटेड ‘दुर्गा एनर्जी’ या ठिकाणी दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले.
ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्याच्या पुढाकारातून साकारला प्रकल्प