यांत्रिकी शाखेच्या विद्यार्थ्यांचा समाजाला उपयोगी संशोधनाला हातभार लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरातील कचरा संकलन करणाऱ्या तीन चाकीच महत्त्व अन्यनसाधारण आहे. रोज ठरल्यावेळी त्या त्या प्रभागात जावून कचरा संकलन करून एका विशिष्ट ठिकाणी तो गोळा करण्याचे कार्य तीनचाकीच्या माध्यमातून प्रत्येक शहरात करण्यात येते. मात्र ही तीन चाकी व्यक्तीच्या चालवणाऱ्यावर अवलंबून असल्याने वेळ व मोठे परिश्रम यामध्ये व्यर्थ होते. यावर मार्ग काढण्याकरिता बापुराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रीकल इंंजिनिअरींग विभागातील अंतीम वर्षातील कुणाल पिपरे, नंदकिशोर गव्हाळे, राहुल निशाने, प्रिया सोडवाले, तेजस्विनी वावरे, तेजस एस. सागर उकळकर, दिपाली मेंढे या विद्यार्थ्यांनी सोलर उर्जेवर चालणारी तीन चाकी विकसित केली आहे. याविषयी अधिक माहिती देतांना विभागप्रमुख व या प्रकल्पाचे मार्गदर्शक डॉ. आर.जी. श्रीवास्तव म्हणाले की, घरातील कचरा ज्या गाडीमध्ये आणून टाकला जातो ती तीन चाकी असलेली कचरा गाडी सर्वाच्या परिचित असते. गाडी वेळेवर का येत नाही असे बऱ्याचदा आपण कचरा गाडी वाहकाला विचारत असतो. वेळेच नियोजन होत नसल्याने कचरा संकलन व्यवस्थित होत नसल्याचे आमच्या निदर्शनास आले. याकरिता पॅडल न मारता ई-रिक्षा तयार होतो काय याचा अभ्यास करून विद्यार्थ्यांनी संशोधन केले. बारकावे काय आहेत, अडचणी काय येतील याचा अभ्यास करून एक उत्तमरित्या सौर उर्जेवर चालणारी तीन चाकी ज्याला ई-रिक्शा म्हणता येईल अशी सायकल विकसित केली. यामध्ये २०० व्हॅटचे सोलर पॅनल वरच्या बाजुने लावण्यात आले असून खाली बॅटरी बसविण्यात आली आहे. शिवाय ब्रसलेस डिसी मोटर, कंट्रोलर, थ्रॉटल असे इलेक्ट्रीक सर्कीट जोडण्यात आले आहे. १९० किलो कचरा ही गाडी विना पॅडल न मारता केवळ हॅण्डल मॅनेज करुन व्यक्ती ओढू शकेल अशा पद्धतीची ही निर्मिती आहे. यामुळे वेळेची आणि श्रमाची बचत होईल. वेळेत त्या त्या ठिकाणी जावून सहजरित्या कचरा संकलन करता येईल. शिवाय तीन चाकी जशी चालत राहील त्या ठिकाणी जावून सहजरित्या कचरा संकलन करता येईल. शिवाय तीन चाकी जशी चालत राहील तशी सौर पॅनल मुळे बॅटरी दिवसभर चार्ज होत राहील. आणि कचरा संकलन करण्याचे काम जलदगतीने होवून शहरातील कचरा संकलनाचे नियोजन व्यवस्थितरित्या होत नाही. ही संकल्पना वर्धेच्या महात्मा गांधी ग्रामोद्योग संस्थेच्या सहकार्याने साकार झाली असून सातत्याने त्यांचे मार्गदर्शन याकरिता लाभले. विशेष म्हणजे तीन चाकीकरिता प्रायोजकत्व सुद्धा एमगिरीने दिले. लवकरच नगरपालिकांमध्ये याचे प्रात्यक्षिक केले जाणार असून वर्धेच्या नगरपरिषदेला हस्तांरण होवू शकते असा आशावाद डॉ. श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. तर प्राचार्य डॉ. एम.ए. गायकवाड यांनी सदर संशोधन समाजपयोगी असून शेतीउपयोगी आणि समाजपयोगी संशोधन करण्यासाठी विद्यार्थ्यांना सातत्याने प्रोत्साहन करण्यात येत असल्याचे सांगितले. गत वर्षी मेकॅनिकल इंजिनिअरिंग विभागाच्यावतीने सौर उर्जेवर चालणारी दिव्यांगासाठी तीन चाकी सायकल विकसित केली असून आज त्याचा दिव्यांग घेत आहे. याचा आनंद असल्याची प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली. समाजपयोगी संशोधनाला हातभार लावून अधिकाधिक संशोधन करण्याचा मानस सदर विद्यार्थ्यांनी व्यक्त केला.
विद्यार्थ्यांनी विकसित केली सौर उर्जेवर चालणारी घंटागाडी
By admin | Published: June 06, 2017 1:12 AM