लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वाहन चालक व मालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी वाहन चालक-मालक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन आ. डॉ. पंकज भोयर यांना सादर करण्यात आले. निवेदन स्विकारताना झालेल्या चर्चेदरम्यान वाहन चालक व मालकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आ. भोयर यांनी दिले.स्थानिक विश्रामगृह येथे मंगळवारी संघर्ष वाहन चालक-मालक संघटनेच्यावतीने आ. डॉ. पंकज भोयर यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. वाहन चालकांची असंघटित कामगार म्हणून नोंद घेण्यात यावी. शिवाय त्यांना सर्व सुविधा देण्यात याव्या. संघटीत कामगार व बांधकाम मजुरांप्रमाणे सरकारी योजनामध्ये समावेश करण्यात यावा. चिरीमिरीचा व्यवहार करणाऱ्या पोलिसांचा त्रासातून मुक्त करण्यात यावे. वाहनावरील सर्व प्रकारचे टॅक्स व पासिंग सम प्रमाणात करण्यात यावे. अपघात प्रसंगी चालकाला होणारी मारहाण रोखण्यासाठी आणि मारहाण करणाºयावर कठोर कारवाई करण्यासाठी कायदा तयार करण्यात यावा. चालकाचे वय ६० वर्ष झाल्यानंतर शासकीय कर्मचाºयाप्रमाणे वृद्ध वाहन चालकाला पेन्शन देण्यात यावी. चालक व मालक यांच्या पाल्यांसाठी शिक्षणाची सुविधा सोबतच कुटूंबासाठी आरोग्य योजना राबविण्यात यावी. चालक व मालक यांना पोस्टल मतदानाचा अधिकार देण्यात यावा. टॅक्सी परमिट फोर व्हीलर गाडी ६+१ च्या जागी ९+१ करण्यात यावे, फोर व्हीलर गाडीचे टॅक्स व इन्शुरन्स कमी करण्यात यावे आदी मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना नितीन चौधरी, राहुल हाडके, दीपक चुटे, सेलू भाजप तालुकाध्यक्ष अशोक कलोडे, सुरेश बावणे, जयंत परिमळ, योगेश खेडकर, रुपेश देशमुख, पंकज वंजारी, अजय घोंगे, प्रफुल्ल वैद्य, हितेश नारनवरे, राजू गावंडे, अमोल गोडे, स्वप्नील शिरसाट, अतुल मोरे, अमित गव्हाळे आदींची उपस्थिती होती.
वाहन चालक-मालकांच्या समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 21:52 IST
वाहन चालक व मालकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावे, अशी मागणी वाहन चालक-मालक संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. तसे निवेदन आ. डॉ. पंकज भोयर यांना सादर करण्यात आले. निवेदन स्विकारताना झालेल्या चर्चेदरम्यान वाहन चालक व मालकांच्या समस्या निकाली काढण्यासाठी आपण प्रयत्न करू, असे आश्वासन आ. भोयर यांनी दिले.
वाहन चालक-मालकांच्या समस्या सोडवा
ठळक मुद्देमागणी : आमदारांना साकडे