लोकमत न्यूज नेटवर्कसेलू : सेलू तालुक्यातील एसटी महामंडळ संदर्भातील समस्याबाबत सोमवारी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत या समस्या सोडविण्याची मागणी केली. सदर समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी एसटी महामंडळच्या अधिकाऱ्यांना दिले.सोमवारी नागपूर येथे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे बैठक बोलावली होती. बैठकीला एसटी महामंडळाचे यंत्र अभियंता महेंद्रकुमार नेवारे, आगार व्यस्थापक पल्लवी चौखट, सहायक वाहतूक अधीक्षक संदीप पिसे, कनिष्ठ अभियंता एस. एस. गुल्हाणे आदी उपस्थित होते. सेलू येथील मुख्य बसस्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत असले तरी येथे बरीच जागा उपलब्ध आहे. मात्र, वर्धा-नागपूर मार्गावरील बसेस बस स्थानकावर न येता परस्पर जातात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या सेलू बस स्थानकावर देण्यात याव्या. केळझर येथील प्रवासी व विद्यार्थी दररोज सेलू, वर्धा व नागपूर येथे ये-जा करतात. वर्धा-नागपूर जाणाºया बसेसला येथे थांबा देण्यासाठी मागील तीन वर्षांपासून प्रयत्न सुरू आहे. अधिकाऱ्यांशी याबाबत चर्चा झाली परंतु, चालक व वाहक गाड्यांना थांबा देत नसल्याने विद्यार्थ्यांचे व महत्त्वाच्या कामासाठी जाणाºया नागरिकांचे नुकसान होत आहे. राष्ट्रीय महामार्ग ३६१ तयार करताना रस्त्याला वळण देण्यात आले. त्यामुळे बसेस या नवीन मार्गावरून जाणार असल्याने येथील प्रवाशांसाठी मोठी अडचण निर्माण होणार आहे. तथापि, महामंडळाच्या बसेस जुन्या मागार्ने गावातून जाव्यात, गरमसूर हे गाव मतदारसंघातील एका टोकावर आहे. येथे जाण्यासाठी कोणतीच साधने नसल्याने सकाळी ११ व सायंकाळी ५ वाजता बस फेरी सुरू करण्यात यावी आदी मागण्या यावेळी आ. भोयर यांनी केली. सदर प्रकरणी योग्य कार्यवाहीचे आदेश यावेळी ना. बावनकुळे यांनी दिलेत.
सेलू तालुक्यातील समस्या सोडवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 10:26 PM
सेलू तालुक्यातील एसटी महामंडळ संदर्भातील समस्याबाबत सोमवारी आमदार डॉ. पंकज भोयर यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेत या समस्या सोडविण्याची मागणी केली. सदर समस्या तातडीने सोडविण्यात याव्या, असे निर्देश पालकमंत्री बावनकुळे यांनी एसटी महामंडळच्या अधिकाऱ्यांना दिले.
ठळक मुद्देआढावा बैठकीत आमदारांचे पालकमंत्र्यांना साकडे