लोकमत न्यूज नेटवर्कसेवाग्राम (वर्धा) : गांधी जयंतीचे औचित्य साधून कॉँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीसाठी अखिल भारतीय कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधीसेवाग्राम येथे आले होते. यावेळी रसोड्यात भोजन आटोपल्यानंतर सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आश्रम परंपरेनुसार स्वावलंबनाचे धडे गिरवीत स्वत:ची ताटे स्वत: धुतली.आश्रमातील प्रार्थना सभा संपल्यानंतर खा.राहुल गांधी, सोनिया गांधी, डॉ. मनमोहन सिंग व अन्य जेष्ठ नेते नयी तालीम समितीच्या रसोड्यात जेवायला गेले. शांतीभवन हॉलमध्ये सोळा जणांची भोजन बैठक व्यवस्था करण्यात आलेली होती तर अन्य लोकांना रसोड्याच्या नियमित भोजन गृहात बसविण्यात आले. भोजन झाल्यानंतर सर्वांनी आश्रम परंपरेप्रमाणे आपल्या जेवनाची भांडी धुवून टाकली. आश्रम पध्दतीचा आग्रह जेवन प्रसंगी खा. राहुल गांधी यांनी ठेवला होता. एक वेगळा अनुभव या निमित्ताने पदाधिकारी यांनी घेतला.असे होते भोजनराहुल व सोनिया गांधी यांच्यासह महत्वाच्या व्यक्तीसाठी जेवनात उकडलेली भाजी, वरण, भात, साधी पोळी, दही, अक्रोट, खजूर व बर्फी अशी व्यवस्था करण्यात आली होती. तर अन्य नेत्यांसाठी झुनका भाकर, ठेचा, गुळाचा दलिया, दही, खांडवी, कटलेट, ढोकळा, दही वडा, खिचडी अशी व्यवस्था होती.
सेवाग्राम आश्रमात सोनिया, राहुल गांधींनी धुतले स्वत:चे ताट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 11:01 PM
गांधी जयंतीचे औचित्य साधून कॉँग्रेसच्या कार्यकारिणी बैठकीसाठी अखिल भारतीय कॉँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सेवाग्राम येथे आले होते. यावेळी रसोड्यात भोजन आटोपल्यानंतर सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी आश्रम परंपरेनुसार स्वावलंबनाचे धडे गिरवीत स्वत:ची ताटे स्वत: धुतली.
ठळक मुद्देआश्रम परंपरेनुसार स्वावलंबनाचे धडे