लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : मागील दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकऱ्यांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. यंदा सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आतापून्हा पावसाने दडीच मारली आहे. शिवाय सध्या अमरवेल सोयाबीन पिकावर आपले वचस्व निर्माण करीत असल्याने सोयाबीन पिकाची वाढ खुंटत आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली असून त्यांना कृषी विभागाच्या तज्ञांनी योग्य मार्गदर्शन करण्याची गरज आहे.यंदा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे पेरणीच्या कामाला वेग देण्यात आला. पिकाची योग्य निगा घेतल्याने पिकही बऱ्यापैकी वाढले. परंतु, गत २० दिवसांपासून पाऊस बेपत्ता झाल्याने सोयाबीन, कपाशी, तूर आली पीक माना टाकत आहेत. कपाशी पिकावर बोंडअळी आक्रमण करेल याची भीती कपाशी उत्पादकांना सतावत आहे. तर काही परिसरात अमरवेलीमुळे सोयाबीन पिकाची वाढच खुंटली आहे. अमरवेलीमुळे सोयाबीन पिकाची वाढ खुंटल्याने जामणी येथील शेतकरी नरेंद्र येणकर यांच्यावर तीन एकरातील सोयाबीन पीक उपटून फेकण्याची वेळ आली आहे. त्यांच्याकडून सध्या अमरवेलीचा नायनाट करण्यासाठी सदर वेलीसह सोयाबीन पिकही उपटून नष्ट केल्या जात आहे. अमरवेलीमुळे फुलावर आलेले सोयाबीन पीक उपटण्याची वेळ या शेतकऱ्यांवर आली आहे. शिवाय पावसाने दडी मारल्याने सोयाबीनची फुलही गळत आहेत. यामुळे या शेतकऱ्याला शासकीय मदत देण्याची मागणी आहे. शेतकरी नरेंद्र येणकर यांनी एक महिन्यांपूर्वी ३ एकरात सोयाबीनची पेरणी केली होती. सदर पीक चांगले बहरले; पण काही दिवसांपूर्वी सदर शेतात अमरवेल मोठ्या प्रमाणात वाढली. अमरवेल शेतातील सोयाबीन पिकाला पूर्णत: झाकून घेत सदर झाडातील पोषक तत्त्व शोषून घेते. यामुळे उत्पादनातही घट येत असल्याचे शेतकरी सांगतात.
अमरवेलीमुळे सोयाबीन पीक धोक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2018 11:38 PM
मागील दोन वर्षात निसर्गाच्या लहरीपणाचा फटकाच शेतकºयांना सहन करावा लागल्याचे वास्तव आहे. यंदा सुरूवातीला पावसाने हुलकावणी दिल्यानंतर आतापून्हा पावसाने दडीच मारली आहे. शिवाय सध्या अमरवेल सोयाबीन पिकावर आपले वचस्व निर्माण करीत असल्याने सोयाबीन पिकाची वाढ खुंटत आहे.
ठळक मुद्देशेतकऱ्यांची वाढली चिंता : पीक उपटण्याची आली वेळ, शासकीय मदतीची मागणी