लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या नक्षलग्रस्त विभागात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार पोलीस महासंचालक मुंबई यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या आदेशाने विशेष सेवापदक व कर्मचाऱ्यांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते देण्यात आले.यात सध्या सावंगी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवचंद खुशाल सिंगणजुडे, पोलीस कल्याण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र गोरख सूर्यवंशी, कारंजा येथील पोलीस उपनिरीक्षक योगेंद्रसिंग राजेंद्रसिंग यादव, सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सौरभ चंद्रकांत घरडे, कारंजा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रामदास माणिक शेंद्रे, आर्वी पोलीस ठाण्याच्या निरीक्षक कविता अशोक फुसे यांचा समावेश आहे.चौघांना आंतरिक सुरक्षा पदकेपोलीस महासंचालकांच्या आदेशान्वये चार कर्मचाºयांना आंतरिक सुरक्षा सेवा पदक मंजूर झाले. त्यांनाही पोलीस अधीक्षकांच्या हस्ते याच कार्यक्रमात पदक प्रदान करण्यात आले. यात जिल्हा विशेष शाखेचे तत्कालीन पोलीस निरीक्षक, वसंत विश्वनाथ मोहुर्ले (सेवानिवृत्त), पुलगाव पोलीस ठाण्याचे तत्कालीन ठाणेदार मुरलीधर पांडुरंग बुराडे (सेवानिवृत्त), समुद्रपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत गणपत चांदेवार आणि पोलीस शिपाई संदीप झिले यांचा समावेश आहे.
सहा पोलीस कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 10:23 PM
गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, नांदेड व यवतमाळ या नक्षलग्रस्त विभागात कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या सहा कर्मचाऱ्यांना विशेष सेवा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार पोलीस महासंचालक मुंबई यांनी जाहीर केला आहे. त्यांच्या आदेशाने विशेष सेवापदक व कर्मचाºयांना पोलीस अधीक्षकांच्या हस्ते देण्यात आले.
ठळक मुद्देपोलीस महासंचालकांचे आदेश : पोलीस अधीक्षकांच्या हस्ते प्रदान