लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शहरात मागील आठ महिन्यांपासून अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारणाचे काम सुरु आहे. या योजनेची मलवाहिनी टाकण्याकरिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे.त्यातील बहुतांश भागातील खोदलेल्या रस्त्यावर सिमेंटीक रण करुन कायमस्वरुपी उपाय योजना केली जात आहे. पण, अजुनही काम सुरुच असल्याने या कामाला गती देत येत्या पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करावे, अशा सूचना नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.नगर परिषेदतील नगराध्यक्षांच्या दालनात नेहमीप्रमाणे अमृत योजनेच्या कामासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या अध्यक्षेतत झालेल्या या बैठकीला उपाध्यक्ष प्रदीपसिंग ठाकूर, मुख्याधिकारी, सभापती, नगर परिषदेतील विभाग प्रमुख तसेच जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तसेच सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याकरिता जवळपास ११० कोटीच्या निधीतून शहरात अमृत योजना राबविली जात आहे. या योजनेतून सध्या मलनिस्सारण योजेनेचे काम सुरु आहे.प्रभाग क्रमांक १, ३, ५ व ९ या प्रभागात मलनिस्सारणच्या कामाकरिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. या खोदकामाचा नागरिकांना आता आणि भविष्यातही त्रास होऊ नये या करिता खोदलेल्या रस्त्यावर सिमेंटीकरण करुन कायमस्वरुपी उपाययोजना करण्याचेही काम सुरु आहे. काही भागातील काम प्रगतीपथावर असून पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी काम पुर्ण करण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहे.शहरासाठी लोकाभीमुख ठरणाऱ्या या योजनेच्या कामाला अधिक गती मिळावी म्हणून आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या नेतृत्वात मुंबई येथे मंगळवारी २८ मे रोजी नगर विकासचे प्रधान सचिव यांच्या कक्षात बैठकीचे आयोजन केले आहे. दुपारी १ वाजता होणाºया या बैठकीत शहरातील अमृत योजनेच्या कामासंदर्भात चर्चा करुन या योजनेला पूर्णत्वास नेण्यासंदर्भात सर्वांचे सहकार्य मिळत आहे.- अतुल तराळे, नगराध्यक्ष, वर्धा.
शहरातील अमृत योजनेच्या कामाला गती द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2019 9:55 PM
शहरात मागील आठ महिन्यांपासून अमृत योजने अंतर्गत पाणीपुरवठा व मलनिस्सारणाचे काम सुरु आहे. या योजनेची मलवाहिनी टाकण्याकरिता रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे.त्यातील बहुतांश भागातील खोदलेल्या रस्त्यावर सिमेंटीक रण करुन कायमस्वरुपी उपाय योजना केली जात आहे. पण, अजुनही काम सुरुच असल्याने या कामाला गती देत येत्या पावसाळ्यापूर्वी खोदलेल्या रस्त्यांचे सिमेंटीकरण करावे, अशा सूचना नगराध्यक्ष अतुल तराळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
ठळक मुद्देनगराध्यक्षांच्या मासिक सभेत सूचना