आॅनलाईन लोकमतवर्धा : दिव्यांगांच्या विकासाकरिता असलेला ३ टक्के निधी खर्च करण्यात सिंदी (मेघे) ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे. या संदर्भात निवेदन देवूनही कार्यवाही झाली नसल्याने सोमवारी प्रहारच्या नेतृत्वात दिव्यांग बांधवांनी सिंदी (मेघे) ग्रा.पं. कार्यालय गाठले. यावेळी ग्रा.पं. कार्यालयात ग्रा.पं. सचिव गैरहजर असल्यने आंदोलनकर्त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाला बेशरमाचे झाड देवून निषेध नोंदविला.या ग्रामपंचायतीत सन २०११ पासूनचा अपंगाचा ३ टक्के निधी अद्यापपर्यंत खर्च केलेला नाही. शासन निर्णय असून सुद्धा समाजातील सर्वात दुर्बल घटकाला या निधीपासून वंचित ठेवले आहे. तसेच सदर निधीचा दूरउपयोग झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला. शिवाय याबाबत विचारणा केली असता ग्रामपंचायतमध्ये दिव्यांग बांधवांना अपमानास्पद वागणूक देत या निधीपासून लाभार्थ्यांना वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप आहे.या प्रकारचे निवेदन ग्रामपंचायतमध्ये द्यायला प्रहारचे कार्यकर्ते गेले असता ग्रामसेवक नसल्याने विकास दांडगे यांच्या नेतृत्वात त्यांच्या खुर्ची व टेबलवर बेशरमचे झाड व फुल ठेवून खूर्चीला निवेदन लावण्यात आले. प्रथम प्रहारच्या पदाधिकाºयांनी ग्रामसेवक धनविज यांना विचार केली असता ते उपलब्ध नव्हते. त्यांच्या भ्रमणध्वनीवर विचारणा केली असता तो बंद होता. कर्मचाºयांना विचारणा केली असता त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. यामुळे पंचायत समितीशी संपर्क साधण्यात आला. याचाही उपयोग झाला नसल्याने संतप्त आंदोलकांनी ग्रामपंचायतीत घोषणाबाजी केली.यावेळी हनुमंत झोटींग, प्रमोद कुरटकर, विजय सुरकार, भूषण येलेकार, नितेश चातुरकर, उमेश गुरनुले, अरविंद मसराम, किशोर लोखंडे, प्रशिल धांदे, शुभम भोयर, महेंद्र इखार, प्रफुल साखरकर, चंद्रशेखर पवार, अजय चंदनखेडे, सुवर्णा वाघमारे उपस्थित होते.निधी खर्च करण्यात सेलू पं.स. उदासीनसेलू - शासननिर्णयानुसार अपंगांसाठी राखीव असलेला ३ टक्के निधी खर्च करण्यात येथील पंचायत समितीच्या अधिकाºयांना उत्सुकता नसल्याचे त्यांच्या कार्यप्रणालीवरुन दिसत आहे. सन २०११ ते आजपर्यंतचा निधी खर्चच केला गेला नसल्याने अपंग बाधंवाप्रती असलेला पंचायत समिती प्रशासनाचा सवतासुभा चव्हाट्यावर आला आहे. ंशासन निर्णयानुसार सन २०११ च्या कृती आराखड्यानुसार सन २०११ ते आजपर्यंतचा पंचायत समितीच्या वार्षिक उत्पन्नातून ३ टक्के निधी अपंगांच्या विकास कार्यावर खर्च करणे सक्तीचे आहे.परंतु सेलू पंचायत समितीला कदाचित शासननिर्णयाचा विसर पडल्याचे दिसत आहे. सदर पंचायत समितीने आजच्या तारखेपर्यंत अपंगांसाठी राखीव असलेला ३ टक्के निधी खर्चच केला नाही. हा ३ टक्के निधी खर्च झाला पाहिजे, याकरिता प्रहार अपंगक्रांती संघटना सेलू तालुकास्तरावर सुनील मिश्रा यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती समोर आंदोलन झाले होते. परंतु आता पुन्हा त्यांना कदाचित शासननिर्णयाचा विसर पडल्याचे दिसत आहे. शासन निर्णय असतानाही सुध्दा अपंगांसाठीचा राखीव निधी सात वर्षांपासून अखर्चितच राहावा ही एक शोकांतिकाच असल्याचा आरोप होत आहे. हा निधी खर्च करण्यासंदर्भात प्रहार अपंग क्रांती संघटनेद्वारे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाºयांना निवेदन सादर केले आहे.
दिव्यांगांकरिता असलेला ३ टक्के निधी खर्च करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2018 10:39 PM
दिव्यांगांच्या विकासाकरिता असलेला ३ टक्के निधी खर्च करण्यात सिंदी (मेघे) ग्रामपंचायत टाळाटाळ करीत आहे.
ठळक मुद्देप्रहारचे सिंदी (मेघे) ग्रामपंचायतीत आंदोलन : बेशरमाचे झाड देत नोंदविला निषेध