शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

वर्ध्यात मद्यधुंद ट्रॅव्हल्स चालकाने केला सात दुचाकी आणि चार सायकलींचा चुराडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2019 3:41 PM

मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅव्हल्स चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून उभ्या कारला धडक दिली.

ठळक मुद्देसुदैवाने कुठलीही जिवीतहानी नाही

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा: मद्यधुंद अवस्थेतील ट्रॅव्हल्स चालकाने आपल्या ताब्यातील वाहन निष्काळजीपणाने चालवून उभ्या कारला धडक दिली. हा ट्रॅव्हल्सचालक इतक्यावर थांबला नाही तर त्याने वाहनाची गती वाढवीत याच भागात रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या सात दुचाकी आणि चार सायकलीचाही चुराडा केला. ही घटना मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास स्थानिक रेल्वे स्थानक मार्गावरील महावीर भोजनालयासमोर घडली. सदर अपघातानंतर संतप्त जमावाने ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून आपला रोष व्यक्त केला. शहर पोलिसांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला.प्राप्त माहितीनुसार, स्थानिक शास्त्री चौक येथून बजाज चौकाच्या दिशेने एम.एच. ३१ सी. क्यू. ५२०५ क्रमांकाची ट्रॅव्हल्स जात होती. याच भरधाव ट्रॅव्हल्सने सुरूवातीला एम.एच.३२ सी. ४१३१ क्रमांकाच्या कारला धडक दिली. त्यानंतर ट्रॅव्हल्सचालकाने सदर वाहनासह घटनास्थळावरून यशस्वी पळ काढण्याचा प्रयत्न केला. याच प्रसंगी सदर आरोपी ट्रॅव्हल्स चालकाने त्याच्या ताब्यातील वाहनाची गती वाढवित रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एम. एच. ३१ डी.पी. ११४९, एम. एच. ३२ डब्ल्यू. १३४८, एम. एच. ३२ ए.ई. ८००६, एम. एच. ३२ व्ही. ०८४३, एम. एच. ३२ एच. १५७०, एम. एच. ३२ एच. ५०७०, एम. एच. ३२ ए.सी. ४५५० या दुचाकींसह चार सायकलींचा चुराडा करून महावीर भोजनालयाच्या पुढे असलेल्या विद्युत खांबाला धडक दिली. या विचित्र अपघातात कुणी जखमी झाले नसले तरी अपघातग्रस्त ट्रॅव्हल्ससह कार, दुचाकी व सायकलींचे नुकसान झाले आहे. अपघात होताच संतप्त नागरिकांनी ट्रॅव्हल्सच्या काचा फोडून आरोपी ट्रॅव्हल्स चालकाला चांगलाच चोप दिला. अपघाताची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक शुभांगी तकीद, सुभाष गावडे, वाघमारे, वर्धा वाहतूक नियंत्रण शाखेचे भोसले, जाधव, फुलगोबे, भगत, भोयर, सुरकार तसेच मार्शल पथकाचे शेंडे, दाते, मसके, लंगडे यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. या घटनेची शहर पोलिसांनी नोंद घेतली आहे.

टॅग्स :Accidentअपघात