लोकमत न्यूज नेटवर्कहिेंगणघाट : पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती हिंगणघाट, जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) पशुसंवर्धन प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत प्रदर्शनाचे आयोजन हिंगणघाट येथील गोकुलधाम येथे करण्यात आले होते.पशुधन विकास अधिकारी डॉ.शशिकांत मांडेकर, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.प्रज्ञा डायगव्हाणे यांनी कार्यक्रमासाठी पशुपालकांना प्रेरित केले. या पशुप्रदर्शनात ३४३ पशुसंह पशुपालकांनी सहभाग घेतला. सात विभागात विभागणी केली असून, संकरित वासरे गट, संकरित गाय गट, घोडे गट, म्हैस गट, स्वान गट, देशी गाय गट, शेळी गट अशी वर्गवारी प्राणी निहाय करण्यात आली होती. यात प्रत्येक गटातील जनावरांचे परीक्षण पशुसंवर्धन अधिकारी नितीन फुके, सहाय्यक आयुक्त अंदूरकर, डॉ.प्रमोद शिंदे या तज्ज्ञाकडून करण्यात आले. प्रत्येक प्रवर्गात प्रथम ७ हजार, व्दितीय ५ हजार तर तृतीय ३ हजार याप्रमाणे २१ पशुपालकांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. यात शेळी गटात भानुदास नारायण ठाकरे सिंदी (रेल्वे) यांच्या शेळीने प्रथम पारितोषीक पटकावले. श्वान गटात आशीष बागडी यांच्या ग्रेटडयान या जातीच्या श्वानाने प्रथम तर सौरभ राजू तिमांडे यांच्या रॉटविलर या जातीच्या श्वानने व्दितीय पारितोषिक पटकावले. घोडा या गटात सुमित राऊत यांच्या घोड्याने प्रथम पारितोषिक मिळविले. सुमित राऊत यांच्या याच घोड्याला सहा लाख रूपयांत मागणी देखील याच प्रदर्शनात झाली. तसेच म्हैस गटात प्रवीण अतकरे यांच्या म्हशीने पहिला क्रमांक पटकाविला तर देशी गाय या गटात जाम येथील गोधन पालक राकेश पटेल यांची गाय पहिल्यास्थानी निवडल्या गेली. संकरित वासरे गटात अनिल सोनवणे यांच्या वासराने बाजी मारली तर संकरीत गाय गटात पुंडलिक वरभे यांची गाय प्रथम आली. या सर्व पशुपालकांला सात हजार रूपयांचे रोख पारितोषिक देण्यात आले. तसेच दुसरा क्रमांक आलेल्या पशुपालकास पाच हजार रोख व तिसरा क्रमांक आलेल्या पशुपालकास तीन हजार रूपये रोख पारितोषिक देण्यात आले. यावेळी दूध दोहणाऱ्या सात जाणांचा सत्कार देखील करण्यत आला. यात लाला तिवारी, नरेश निमसारकर, मुरलीधर घाटुरले, संदीप उरकुडकर यांचा प्रामुख्याने सहभाग आहे. मार्गदर्शन करताना आमदार समीर कुणावार म्हणाले, दरवर्षी या पशुप्रदर्शनासाठी वेगळे बजेट आखलेले असते. या बजेटमध्ये आणखी वाढ करण्याचा माझा प्रयत्न आहे. यावेळी पंचायत समिती सभापती गंगाधर कोल्हे, नगराध्यक्ष प्रेम बसतांनी, पशुसंवर्धन सभापती मुकेश भिसे, पं.स.उपसभापती सुवर्णा भोयर, जिल्हा परिषद सभापती जयश्री चौके, मनदार मराठे, मुख्य आयोजक डॉ.शशिकांत मांडेकर डॉ.अमित लोहकरे उपस्थित होते.
पशुप्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 8:27 PM
पशुसंवर्धन विभाग, पंचायत समिती हिंगणघाट, जिल्हा परिषद वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) पशुसंवर्धन प्रदर्शन व प्रचार कार्यक्रम २०१८-१९ अंतर्गत प्रदर्शनाचे आयोजन हिंगणघाट येथील गोकुलधाम येथे करण्यात आले होते.
ठळक मुद्दे३४३ पशूंचा सहभाग : २१ पशुपालकांना पारितोषिक