प्रशांत हेलोंडे।लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : पिकांवरील कीड घालविण्याकरिता शेतकºयांकडून विविध विषारी औषधांच्या फवारण्या केल्या जातात. हे औषध पिकांकरिता जरी तारक ठरत असले तरी शेतकºयांकरिता मारक ठरू लागले आहे. फवारणीच्यावेळी आवश्यक काळजी घेतली नसल्याने जिल्ह्यात २० शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे. यामुळे हा धोका टाळण्याकरिता फवारणी करताय; जरा जपूनच, असा संदेश देण्याची गरज निर्माण झाली आहे.यंदा पाऊस कमी आल्याने सोयाबीन, कपाशी, तुरी या पिकांवर किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. कपाशीवर पांढरी माशी, चिप्स, बोंडअळी, चुरडा यासह रोग दिसत आहे. या किडीवर उपाययोजना करण्याकरिता कृषी विभागाकडून अनेक औषधे सुचविल्या जातात. या औषधात विषारी तथा शरीरास हानीकारक घटक असतात. या घटकांचा फवारणी करणाºयाच्या शरीरावर विपरीत परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.हा प्रकार केवळ निष्काळजीमुळे घडल्याने शेतकºयांनी फवारणी करताना काळजी घेणे गरजेचे झाले आहे. फवारणी करताना शेतकºयांनी हातात ग्लोज, चेहºयाला मास्क बांधणे गरजेचे आहे. असे न केल्यास औषधी फवारताना ते हवेत उडून नाका, तोंडातून शरीरात जाते. यामुळे मळमळ, उलटी आदी लक्षणे दिसून येतात. यावर त्वरित औषधोपचार घेणेच इष्ट ठरते. अन्यथा जीवित हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. विदर्भातील अन्य जिल्ह्यात मात्र उपचार घेणाºयांची संख्या मोठी असल्याचे दिसून आहे.औषधीच्या संपर्काने काय दिसतात लक्षणेफवारणी करण्यासाठी वापरण्यात येणाºया औषधींमध्ये विषारी घटकद्रव्य अधिक प्रमाणात असतात. यामुळे ते शरीरासाठी हानीकारक ठरू शकतात. काही औषधी अंगावर लागली तरी त्याचे परिणाम जाणवतात. हातावर लागल्यास अॅलर्जी असलेल्या व्यक्तीला अंगावर पुरळ येणे, फोड येणे आदी लक्षणे दिसून येतात. हवेत उडून नाका-तोंडातून हे औषध पोटात गेल्यास मळमळ होणे, हे लक्षण दिसते; पण फवारणी दरम्यान, तंबाखू, खर्रा आदी मादक पदार्थांचे सेवन केल्यास औषधी तोंडात जाते. यामुळे मळमळ होणे, उलटी येणे, चक्कर येणे, अंगाला खाज सुटणे आदी लक्षणे आढळून येतात. यावर त्वरित उपचार घेणेच गरजेचे ठरते.काय घेतली पाहिजे काळजीकपाशीवर वा अन्य कोणत्याही पिकांवर फवारणी करीत असताना झाड उंच असेल तर नाक-तोंड बांधले पाहिजे. हातात ग्लोव्हज घातले पाहिजेत. फवारणी सुरू असताना हात-पाय धुतल्याशिवाय कुठल्याही पदार्थाचे सेवन करू नये. कोणत्याही प्रकारे औषधी शरीराच्या आत जाऊ देऊ नये. फवारणी करताना फुल पॅन्ट आणि फुल शर्ट घातला पाहिजे. फवारणी लवकर व्हावी म्हणून पंपामध्ये अधिक पाणी भरले जाते; पण ते चुकीचे आहे. अधिक पाणी भरल्याने ते सांडून धोका होण्याची शक्यता असते. यासाठी पंपामध्ये पाणी कमी भरणे गरजेचे आहे. उन्ह अधिक असल्यास फवारणी करताना घाम येतो. यातूनही शरीरावर औषधींचा परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.जैविक खते, औषधीच योग्यरासायनिक खते, औषधांच्या अतिरेकी वापरामुळे जमिनीचा पोत घसरत आहेत. शिवाय विविध रासायनिक औषधींमुळे मानवी जीवनासही धोका निर्माण झालेला आहे. हा प्रकार टाळण्याकरिता शेतकºयांनी जैविक शेतीकडे वळणेच गरजेचे झाले आहे. गांडूळ खत, जैविक औषधी यांच्या वापरातूनही चांगले उत्पादन घेता येत असल्याचे शेतकºयांनीच सिद्ध केले आहे. यातील औषधांमुळे शेतकºयांना फारसा धोका नसतो. यामुळे शेतकºयांनी जैविक शेतीची कास धरणे गरजेचे झाले आहे.शेतकरी, शेतमजुरांनी फवारणी करताना संपूर्ण काळजी घेणेच गरजेचे असते. तोंडाला मास्क लावल्याशिवाय फवारणी करू नये. फवारणी करताना विषबाधा झालेल्या वर्षभरात दोन-तीन रुग्णांची नोंद आहे; पण त्यांच्यावर विष घालविण्याच्या औषधोपचाराची गरज पडली नाही.- डॉ. गोपाळ नारळवार, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय, पुलगाव.सध्याची औषधी फारशी विषारी नाहीत. असे असले तरी शेतकºयांनी काळजी घेणे गरजेचे असते. पीक उंच असल्यास नाक-तोंड बांधून तथा फुल पॅन्ट व शर्ट घालूनच फवारणी केली पाहिजे.- पांडुरंग बाभूळकर, व्यावसायिक, समुद्रपूर.
फवारणी करताय; जरा जपून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 03, 2017 10:28 PM
पिकांवरील कीड घालविण्याकरिता शेतकºयांकडून विविध विषारी औषधांच्या फवारण्या केल्या जातात. हे औषध पिकांकरिता जरी तारक ठरत असले तरी शेतकºयांकरिता मारक ठरू लागले आहे.
ठळक मुद्देपिकांवर अळीचा प्रादुर्भाव : औषधी वापरताना शेतकºयांनी काळजी घेणे गरजेचे