लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड केली. कपाशीचे पीक जोमात बहरले. सततच्या पावसाने पिकासोबत तणही चांगलेच वाढले. शेतकऱ्यांनी गवत नष्ट करण्यासाठी कपाशी पिकात तणनाशक औषधीची फवारणी केली. मात्र, फवारणीने गवतासोबत कपाशीचे पीक पूर्णत: जळाले. तालुक्यात मोठ्या प्रमाणात हा प्रकार घडला. त्यामुळे शेतकºयांवर संकट कोसळले आहे.मौजा चिकणी परिसरात दोन-तीन शेतकºयांच्या शेतात असाच प्रकार घडला. देवळी येथे रहिवासी असलेल्या एका शेतकऱ्यांने मौजा चिकणी येथे सात एकर शेत एक वर्षाकरीता ठेक्याने केले. संबंधित शेतकऱ्याने सातही एकर शेतात कपाशी पिकाची लागवड केली. गत १०-१२ दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या सततधार पावसामुळे पिकापेक्षा गवतच अधिक प्रमाणात वाढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी गवत नष्ट करण्याकरिता मजुरांकडून कपाशी पिकाच्या शेतात तणनाशक औषधीची फवारणी केली. मात्र, याचा विपरित परीणाम होऊन शेतातील कपाशीचे पीकच जळाले. यात संबंधित शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.संततधार पावसामुळे आता शेतात पाणी साचलेले असल्यामुळे पिकाला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. फवारणीत औषधीची मात्रा अधिक अधिक झाली की काय, अंदाज शेतकरी व्यक्त करीत आहेत.नगदी पीक जळाल्यामुळे शेतकरी चिंतातुर आहेत. यामुळे शेतीचे संपूर्ण अर्थकारणच विस्कटण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. मजूव मिळत नसल्याने अशा घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे बोलत आहेत.मजुरांअभावी करावी लागते तणनाशकाची फवारणी१०-१२ दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्यामुळे कपाशीच्या शेतात अधिक गवत वाढले. चार-पाच दिवसांपासून पावसाने उसंत घेतल्यामुळे प्रत्येक कापूस उत्पादक शेतकरी निंदण करण्याकरिता महिला मजुरांच्या मागावर आहेत. परंतु, महिला मजुरांची कमतरता असल्यामुळे व सर्व शेतकऱ्यांचे निंदणाचे काम एकाच वेळेस आल्याने मजूर मिळणे कठीण झाले आहे. तसेच मजुरांचे दरही न परवडणारेच आहे. पूर्वी महिला मंजूर दिवसभर निंदणाचे काम करायच्या; परंतु हल्ली मात्र तसेच राहीले नाही. घड्याळाच्या तासाप्रमाणे निंदण करतात. सकाळी ७ ते ९, ८ ते १, १० ते ५ अशा वेळा ठरल्या आहेत. तसेच ८ ते ३ या वेळेचे ७०, २००, २५० रुपये याप्रमाणे महिला मजुरांचे दर ठरले आहेत. इतके असूनसुद्धा मजूर मिळणे अवघड झाले आहे. यामुळेच गवत काढण्याकरिता तणनाशकाचा उपयोग करावा लागत असल्याचे शेतकरी सांगतात. शेतकºयांना गवत काढायची घाई असते, कारण खत देणे, कीटकनाशक, पिकाची पत सुधारण्याकरिता टॉनिक औषधी फवारणी, डवरणी आदी कामे उरकवायची असतात. याकरिता गवत काढणे गरजेचे असते.- शेतातील पाणी बाहेर काढावे, मलूल झालेल्या झाडांच्या बुडात २ ते ३ ग्रॅम युरिया द्यावा, कपाशीचे झाड पायाच्या बोटात धरून दाबावे, कॉपर आॅक्सिक्लोराईड २५ ग्रॅम अधिक १५० ग्रॅम युरिया अधिक १५० ग्रॅम पोटॅश प्रति १० लिटर पाण्यात मिसळून तयार केलेले द्रावण प्रतिझाड १५० ते १५० मिली ड्रेनचिंग करून द्यावे व याच द्रावणाची पिकावर फवारणी करावी . परत ४ दिवसांनी १०० ग्रॅम ट्रायकोडर्मा १० लिटर पाण्यात मिसळून प्रति झाड १०० मिली द्रावण बुडात ओतावे. एक जरी झाड मलूल झालेले दिसले तरी वरील उपाययोजना दिसताक्षणी सुरू करणे गरजेचे आहे, कारण प्रसार अती वेगाने होतो.- टी. ए. घायतिडकतालुका कृषी अधिकारी, वर्धा.
तणनाशक फवारल्याने कपाशी जळाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 10:30 PM
यावर्षी हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा अंदाज वर्तविल्यामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशी पिकाची लागवड केली. कपाशीचे पीक जोमात बहरले. सततच्या पावसाने पिकासोबत तणही चांगलेच वाढले. शेतकऱ्यांनी गवत नष्ट करण्यासाठी कपाशी पिकात तणनाशक औषधीची फवारणी केली. मात्र, फवारणीने गवतासोबत कपाशीचे पीक पूर्णत: जळाले.
ठळक मुद्देकपाशीवर केलेला खर्च गेला वाया : शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान