शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
4
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
5
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
6
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
7
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
8
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
10
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
11
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
12
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
13
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
14
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
15
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
16
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
17
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
18
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
19
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
20
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'

प्रवाशांचे हाल एसटी कर्मचाऱ्यांना पाहवेनात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2021 5:00 AM

आम्ही आमच्या न्यायिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. आमच्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास होत आहे याची आम्हाला जाण आहे. परंतु, आम्ही आता आमचा लढा मागे घेतला तर, आतापर्यंत दिलेल्या लढ्याला अर्थ उरणार नाही, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर रापमच्या एका चालकाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : रापमच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. यामुळे रापमच्या बसेस आगारांमध्येच उभ्या आहेत. असे असले तरी खासगी प्रवासी वाहतूक सेवा सुरू असली तरी खासगी प्रवासी वाहतूक करणारे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनांत कोंबून प्रवाशांची ने-आण करीत असल्याने खासगी प्रवासी वाहतूक सध्या धोक्याची ठरत आहे. प्रवाशांचे होणारे हाल एसटी कर्मचाऱ्यांना पाहवत नसून आमच्या मागण्यांचा शासनाने वेळीच विचार करून योग्य निर्णय घ्यावा आणि पुन्हा रापमची प्रवासी बस सेवा सुरू करावी, अशी अपेक्षा आहे.

प्रवाशांना त्रास होतोय, आम्हालाही कळतेय...

आम्ही आमच्या न्यायिक मागण्यांसाठी शांततेच्या मार्गाने लढा देत आहोत. आमच्या काम बंद आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास होत आहे याची आम्हाला जाण आहे. परंतु, आम्ही आता आमचा लढा मागे घेतला तर, आतापर्यंत दिलेल्या लढ्याला अर्थ उरणार नाही, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर रापमच्या एका चालकाने सांगितले.

जिल्ह्यातील काही भागात खासगी प्रवासी वाहतूक करणारे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशांना वाहनांमध्ये कोंबून प्रवााशांची ने-आण करीत आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांना त्रास होत असल्याची आम्हाला जाण आहे. पण, आमचा लढा न्याय हक्कांसाठीच आहे, असे नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर रापमच्या एका वाहकाने सांगितले.

मागण्या योग्य पण, वेठीस धरणे अयोग्य

आंदोलनामुळे रापमच्या बसेस आगारांमध्येच आहे. त्यामुळे प्रवाशांना खासगी प्रवासी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. आंदोलनकर्त्यांनी त्यांचा लढा कायम ठेवावा पण, प्रवाशांना त्रास होत आहे याचीही जाणीव त्यांनी ठेवली पाहिजे.- सुनील उईके, प्रवासी. 

रापमचे कर्मचारी आपल्या न्यायिक मागण्यांसाठी लढा देत आहेत. असे असले तरी त्यांनी शासन तसेच प्रवाशांना वेठीस धरणे हे अयोग्यच आहे. आंदोलनकर्त्यांनी प्रवाशांचाही विचार करावा.- गजानन तुपकर, प्रवासी.

६१ कर्मचाऱ्यांवर झाली निलंबनाची कारवाई

-    आंदोलन मागे घेत कामावर रुजू होण्यासंदर्भात वारंवार विनंती करूनही अधिकाऱ्यांच्या सूचनांकडे पाठ दाखविली जात असल्याचा ठपका ठेवून आतापर्यंत तब्बल ६१ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.-    असे असले तरी आपल्या मागण्यांवर ठाम असलेल्या रापमच्या कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरूच आहे. मंगळवारी तळेगाव आगारातून आष्टी मार्गावर केवळ एक बस सोडण्यात आली. या बसने दिवसभरात पाच फेऱ्या पूर्ण केल्या.

 

टॅग्स :state transportएसटी