लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : वीजनिर्मिती प्रकल्प विदर्भात असून जमीन, पाणी व कोळसाही विदर्भाचा वापरला जात आहे. परिणामी, प्रदूषण आणि जनतेची होरपळही विदर्भातील नागरिकांचीच होत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ३ जून रोजी ‘विशाल वीज मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे. नागपुरातील संविधान चौक ते कोराडीस्थित ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानापर्यंत मार्च काढून ठिय्या आंदोलन करणार आहे, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य संयोजक राम नेवले यांनी पत्रकार परिषदेत दिली.विदर्भात ४१०० मेगावॅट वीज शिल्लक असताना सुद्धा विदर्भात सरकार पुन्हा १३२ नवीन कोळसा आधारित आणून ८६४०७ मेगावॅट वीज तयार करुन दिल्ली-मुंबईच्या इंडस्ट्रीयल कॉरिडॉरकरिता पाठविणार आहे. यासाठी अधिकचे वीज उत्पादन होणार असल्याने विदर्भाचा विनाश होईल.देशातील सर्वांत जास्त उष्ण १० जिल्ह्यांपैकी ७ जिल्हे नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, गडचिरोली विदर्भातील आहे. नैसर्गिकरीत्या उष्ण होत असले तरी वीज प्रकल्पामुळे आणखीच उष्ण होत आहे. असे असतांना लोकप्रतिनिधींना याचे काही देणेघेणे नाही. महाराष्ट्रावरील कर्ज वाढत आहे. कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी पैसे नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. शेतकऱ्यांना वीज मिळत नाही, असे अनेक प्रश्न असल्याने स्वतंत्र विदर्भ राज्य हाच पर्याय आहे. त्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.विदर्भातील सर्व जनतेचे झोपडपट्टी, शेतकरी पासून तर व्यापारी, उद्योजक, कारखानदारी या सर्वांचे दर निम्मे करावे, नवीन वीज प्रकल्प रद्द करून प्रदूषण टप्प्याटप्प्याने कमी करून प्रदूषणमुक्त विदर्भ करावा, ग्रामीण भागातील भारनियमन बंद करून २४ तास वीज द्यावी, शेतकºयांना कृषिपंपाच्या वीज देयकातून मुक्त करावे या मागण्यांकरिता संविधान चौक ते कोराडीपर्यंत वीज मार्च काढणार असल्याचेही राम नवले यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेला माजी आमदार अॅड. वामनराव चटप, महिला आघाडीच्या अध्यक्षा रंजना मामर्डे, शैला देशपांडे, ज्योती निकम, माधुरी पाझारे, मधुसूदन हरणे, गजानन निकम, रूपेश शिदोडकर, हेमराज इखार, उल्हास कारोटकर, दत्ता राऊत, सतीश दाणी, गणेश मुटे, सारंग हरणे, किसना शेंडे, शांताराम भालेराव, तुकाराम थुटे आदींची उपस्थिती होती.
ऊर्जामंत्र्यांच्या निवासस्थानी करणार ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2019 8:26 PM
वीजनिर्मिती प्रकल्प विदर्भात असून जमीन, पाणी व कोळसाही विदर्भाचा वापरला जात आहे. परिणामी, प्रदूषण आणि जनतेची होरपळही विदर्भातील नागरिकांचीच होत आहे. त्यामुळे सरकारला जागे करण्यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समितीच्यावतीने ३ जून रोजी ‘विशाल वीज मार्च’ चे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देराम नेवले यांची माहिती : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा वीज मार्च