प्रवाश्यांचे आरोग्य धोक्यात : शुद्धीकरण प्रक्रियेविनाच पुरविले जाते पाणीहेमंत चंदनखेडे हिंगणघाटस्थानिक रेल्वे स्थानकावर अशुद्ध पाण्याचा पुरवठा होत आहे. पाणी पुरवठा करणारी विहीर अनेक वर्षांपासून स्वच्छ करण्यात आली नहाी. शिवाय परिसरात अस्वच्छता पसरलेली आहे. या दूषित पाण्यामुळे प्रवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. रेल्वे प्रशासनाने याकडे लक्ष देत रेल्वे स्थानकावर शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्याकरिता उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.मध्ये रेल्वे अंतर्गत येणारे स्थानिक रेल्वेस्थानक दक्षिणेकडे जाणाऱ्या रेल्वे मार्गावरील वर्र्ध्यानंतर प्रथम प्रमुख रेल्वेस्थानक आहे. येथील रेल्वे स्थानकावर दोन फलाट असून अप-डाऊन गाड्यांचा प्रवास सुरू असतो. एक्सप्रेस गाड्यांना थांबा असल्याने प्रवासी पिण्याचे पाणी घेण्याकरिता स्थानकावर उतरतात; पण हे पाणी अशुद्ध आणि अस्वच्छ आहे काय, हे कळण्यास त्यांना मार्ग नसतो. ही बाब कित्येकांच्या ध्यानीमनीही येत नाही. अजाणतेपणामुळे अशुद्ध पाण्याचाच वापर होतो. १९५४ मध्ये हिंगणघाट रेल्वे स्थानकावर पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याच्या उद्देशाने पोद्दार बगीचाजवळील एका विहिरीतून पाईपलाईन टाकण्यात आली. स्वत:च्या मालकीची जागा आणि विहीर ही रेल्वे स्थानकापासून ४०० ते ५०० मीटर अंतरावर आहे. या विहिरीला कुंपण भिंत असली तरी फाटक नसल्याने परिसर मोकळाच आहे. या विहिरीतून पाईपलाईने रेल्वे स्थानकावरील टाकीमध्ये पाणी घेतले जाते. तेथून पाणी स्थानकावर लावलेल्या नळांद्वारे प्रवाश्यांना उपलब्ध करून दिले जाते. एका फलाटावर पिण्याच्या पाण्याचे नऊ स्टँड लावण्यात आले असून यात प्रत्येकी दोन नळांचा संच आहे. दोन फलाटावर एकूण १८ नळांचे स्टँड आहे. १६ स्टँड हे साध्या पाण्याचे तर दोन स्टँडवर थंड शुद्धीकरणासह पाण्याची सुविधा असलेले नळ संच आहेत. यातील १६ स्टँडद्वारे प्रवाश्यांना पुरविण्यात येत असलेले पाणी शुद्धीकरण प्रक्रिया न करताच मिळते. गत कित्येक वर्र्षांपासून सदर विहीर स्वच्छ करण्यात आली नाही. यामुळे परिसरात दुर्र्गंधी पसरली असून विहिरीतील पाणी दूषित होत आहे. विहिरीच्या परिसरात कचरा वाढला असून रेल्वे प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे विहिरीतील पाणी अस्वच्छ व दूषित झाले आहे. या विहिरीची अवस्था वाईट असून अस्वच्छतेने कहर केला आहे. पाईपलाईनही जुनाट झाल्याने जागोजागी सडली आहे. या पाईपाईनमध्ये गटारातील पाणी मिळसले जात असल्याचेही दिसून येते. हेच अस्वच्छ व दूषित पाणी रेल्वे स्थानकावर प्रवाश्यांना उपलब्ध होत आहे. या प्रकारामुळे प्रवाश्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. पिण्याचे स्वच्छ पाणी प्रवाश्यांना उपलब्ध करून देण्याची रेल्वेची योजना अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे धोकादायक ठरण्याची शक्यता आहे. रेल्वे प्रशासनाने ही बाब लक्षात घेत त्वरित कारवाई करून योग्य व्यवस्था करावी, अशी मागणी होत आहे.
रेल्वे स्थानकावर अस्वच्छ पाण्याचा पुरवठा
By admin | Published: September 17, 2015 2:41 AM