लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : परिसरातील शेतासाठी सामूहिक रस्ता असलेल्या शिवपांदणीच्या मधोमध तारांचे कुंपण घालून रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने हे बांधकाम केले जात आहे. महसूल कार्यालयाच्या नोंदीनुसार हा रस्ता एकपाळ्याकडे जाणारी शिवपांदण असताना रस्ता अडविल्याचा उपद्रव्याप केला जात असल्याचे शेतकरी सांगतात.स्थानिक न.प.च्या पाणी पुरवठा योजनेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने अंदोरी ते देवळी या दरम्यान नव्याने पाईप लाईन टाकून योजनेचे काम पूर्णत्वास नेले जात आहे. यासाठी वॉटर प्रेशरसाठी वाटखेडा चौफुलीवर नव्याने पाण्याचे टाकी बांधण्यात आली आहे. याचे सभोवताल ताराचे कुंपण केले जात आहे;पण हे कुंपण एकपाळाकडे जाणाऱ्या ७० फुट रूंदीच्या शिवपांदणीवर करण्यात येत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांचा बैलबंडीचा रस्ता बंद झाला आहे. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता कास्तकारांना उडवा-उडवीचे उत्तर दिले जात आहे. स्थानिक न.प.चा व वाटखेडा चौफुलीवरील शिवपांदण रस्त्याचा काही एक संबंध नसताना आम्ही न.प. मालकीचे जागेत कुंपण घालीत असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे. आधीच या शिवपांदणीवर ३५ वर्षाचे आधी पाणी पुरवठ्याच्या टाकीचे बांधकाम करून रस्त्याचा काही भाग व्यापला आहे. आता पुन्हा पाणी पुरवठ्याच्या नवीन योजनेसाठी शेतपांदणीचे बाजुला दुसऱ्या टाकीचे बांधकाम करून दोन्ही टाकीचे सभोवताल तारेचे कुंपण केले जात आहे. यामुळे शेतशिवाराचा पूर्ण रस्ता बंद झाला आहे. शेतातील कापूस व इतर शेतमाल कसा आणावा असा प्रश्न सध्या शेतकऱ्याना भेडसावत आहे. वॉटर प्रेशरसाठी नव्याने टाकीचे बांधकाम करण्यात आल्यामुळे रस्त्याच्या मधोमध असलेली जुनी टाकी पाडण्यात आली. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची भूमिका न्यायसंगत नसल्यामुळे तहसीलदार तेजस्वीनी जाधव यांनी संबंधितांना समज द्यावा, अशी मागणी शेतकरी संतोष मरघाडे, सुरेश वैद्य, मारोती मरघाडे, रामाजी काटेखाये, नरेंद्र तिगावकर, राजू देशमुख यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. योग्य निर्णय घेण्याची गरज आहे.शेताकडे जाणारा रस्ताच झाला बंदआधीच या शिवपांदणीवर ३५ वर्षाचे आधी पाणी पुरवठ्याच्या टाकीचे बांधकाम करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्याचा काही भाग यात व्यापल्याने पूर्वीच शेतकºयांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आता पुन्हा पाणी पुरवठ्याच्या नवीन योजनेसाठी पांदणीचे बाजुला दुसऱ्या टाकीचे बांधकाम करून दोन्ही टाकीचे सभोवताल तारेचे कुंपण केले जात आहे. यामुळे शेतशिवाराचा पूर्ण रस्ता बंद झाला आहे. शेतात कसे जावे हा प्रश्न या भागातील शेतकºयांना भेडसावत असून संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी याकडे लक्ष देत कार्यवाही करण्याची मागणी आहे.
शिवपांदणीवर तारेचे कुंपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 11:56 PM
परिसरातील शेतासाठी सामूहिक रस्ता असलेल्या शिवपांदणीच्या मधोमध तारांचे कुंपण घालून रस्ता अडविल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्यावतीने हे बांधकाम केले जात आहे.
ठळक मुद्देजीवन प्राधिकरणाचा प्रताप : वाटखेडा चौफुलीवरील कास्तकारांचा रोष