२५ मे ते ८ जूनपर्यंत नक्षत्र पंधरवडा : सोयाबीन व तूर प्रात्यक्षिकाचा समावेशलोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : शेतकऱ्याला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांच्या उत्पन्नात वाढ होणे आवश्यक आहे. हेच उद्दिष्ट ठेवून शेतकऱ्यांचे उत्पन्न २०२२ पर्यंत दुप्पट करण्यासाठी यावर्षीपासून ‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात येत आहे. या अभियानाची जनजागृती करण्यासाठी जिल्ह्यात २५ मे ते ८ जून रोहिणी नक्षत्र पंधरवडा राबविण्यात येत आहे.बियाण्यांच्या जातीची जेवढी उत्पादकता आहे, तेवढी उत्पादकता आणणे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या रकमेपेक्षा अधिक उत्पन्न प्राप्त करून देणे, पीक उत्पादकतेत स्थैर्य राखत उत्पादन खर्च कमी करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. पिकाची उत्पादकता तपासण्यासाठी प्रत्येक प्रात्यक्षिकाला पीक कापणी प्रयोग अनिवार्य असणार आहे. सोबत ा सुक्ष्म सिंचन, मृद आरोग्य पत्रिकेनुसार आवश्यक खत पुरवठा आणि सेंद्रीय शेती, प्रती थेंब अधिक उत्पादन यावर या अभियानात विशेष भर देण्यात येणार आहे. अभियानांतर्गत सोयाबीन आणि तूर पिकाचे प्रात्याक्षिक घेण्यात येणार आहे. यासाठी प्रत्येक कृषी सहायकाला १० हेक्टरचे प्रात्यक्षिक उद्दिष्ट देण्यात आले आहे. एका प्रात्यक्षिकात २५ शेतकरी समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. तूर पिकासाठी आर्वी, कारंजा व समुद्रपूर तालुक्यात ७५० हेक्टरवर ७५ प्रात्यक्षिकांमध्ये १८७५ शेतकऱ्यांना समाविष्ट करून घेण्यात येणार आहे. सोयाबीन पिकासाठी ८ तालुक्यांत १८१० हेक्टरवर १८१ प्रात्यक्षिकांत ४५२५ शेतकऱ्यांचा समावेश करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रात्यक्षिकात समावेशीत शेतकऱ्यांकडे कृषी सहायक वारंवार शेत भेट देतील. पिकांची वाढ, कीड व्यवसथापन, खत व पाणी व्यवस्थापन आणि इतर काळजी घेण्याबाबत मार्गदर्शन करेल.यासाठी शेतकऱ्यांची निवड करण्यात आली असून शेतकरी गटामार्फत वा शेतकऱ्यांनी खुल्या बाजारातून खरेदी केल्यास निविष्ठांचे अनुदान आधार लिंक असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येईल. संपूर्ण तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यावर भर आहे. निवड झालेल्या शेतकऱ्यांचे प्रशिक्षण २२ मे पासून सुरू झाले असून ते २७ मे पर्यंत चालणार आहे. कृषी विज्ञान केंद्र सेलसुरा, जाम व तळेगाव येथील कृषी चिकित्सालय येथे शास्त्रज्ञ, अधिकारी शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहे. यात प्रगतशील शेतकऱ्यांचाही सहभाग आहे. कृषी सहायक, कृषी पर्यवेक्षक व तालुका कृषी अधिकाऱ्यांचे विभागीय व जिल्हास्तरावर प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आल्या आहेत.शेतकऱ्यांना मिळणार मोफत गाळयुक्त मातीआर्वी : राज्य शासनाद्वारे गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार योजना राबविली जात आहे. यात सावंगी (पोळ) येथील तलावात साचून असलेली गाळयुक्त माती २६ मे पासून जेसीबीद्वारे काढण्याचे नियोजन आहे. या प्रक्रियेत तलवातून काढण्यात येणारा सुपिक गाळ शेतकऱ्यांना मोफत मिळणार आहे. यासाठी शेतकऱ्यांना स्वत:चे नाव तहसीलदार कार्यालयात नोंदवावयाचे आहे. गाळ वाहून नेणाऱ्या वाहनाचा प्रकार, अंदाजे फेऱ्यांची संख्या आणि स्वत:चा दूरध्वनी क्रमांकाची नोंद शेतकऱ्यांना तहसील कार्यालयातील आकाश अजमीरे यांच्याकडे करावी लागणार आहे. उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानात समाविष्ट प्रत्येक शेतकऱ्यावर कृषी सहायकाने बारीक लक्ष ठेवावे. या अभियानाचा उद्देश सफल करावा. कृषी विभाग आणि इतर विभागाच्या योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या अभियानात समाविष्ट करून घ्यावे. - शैलेश नवाल, जिल्हाधिकारी, वर्धा.
‘उन्नत शेती, समृद्ध शेतकरी’ अभियान प्रारंभ
By admin | Published: May 25, 2017 1:00 AM