ठळक मुद्दे४१०० रुपये भाव हजार क्विंटलची आवक
लोकमत न्यूज नेटवर्कनारायणपूर : समुद्रपूर तालुक्यातील नंदोरी येथील चोरडिया इंडस्ट्रीजमध्ये सोमवारी कापूस खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी कृउबास संचालक अतुल वांदिले, महेश पाटील झोटींग, बँक आॅफ महाराष्ट्रच्या व्यवस्थापक वैशाली गहूकर, सरपंच डॉ. युवराज तांदूळकर, मनोज पिंपळकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी प्रथम बैलगाडी आणणारे शेतकरी दीवाकर पारखी गोविंदपूर यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. आज आलेल्या सर्वच शेतकºयांना ४१०० रुपये प्रती क्विंटल भाव देऊन कापूस खरेदी करणार असल्याचे अशोक वांदिले यांनी सांगितले. दिवसभरात या केंद्रावर एक हजार क्विंटल कापसाची आवक झाली.