लोकमत न्यूज नेटवर्कचिकणी (जामणी) : दहेगाव (गावंडे) येथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी बोगदा तयार करून तेथून ये-जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे. सदर बोगद्या जवळून नाला गेला असून पावसाळ्याच्या दिवसात नाल्याला पूर आल्यावर ये-जा करणे कठीण होते. यामुळे पावसाळ्याचे चार महिने रेल्वे फाटकाहून ये-जा करण्यास अनुमती देण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांची आहे. तसे निवेदन संबंधितांना देण्यात आले आहे.गावामध्ये जाण्यासाठी रेल्वे विभागाने रेल्वे फाटक बंद करून सिमेंटचा बोगदा तयार केला आहे. मात्र, बोगद्या शेजारून नाला गेला असून पावसाळ्याच्या दिवसात तेथून ये-जा करणे धोक्याचे ठरणारे आहे. सदर बोगद्याची निर्मिती करताना रेल्वे विभागातील अभियंत्यांनी काही प्रमाणात स्थानिक नागरिकांचे म्हणणे समजावून घेणे गरजेचे होते. परंतु, तसे करण्यात आले नाही. इतकेच नव्हे तर मनमर्जी कामाचा सपाटाच लावण्यात आला. त्यामुळे पावसाच्या पाण्यात व नाल्याला पूर आल्यावर ये-जा करणाºयांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. सदर काम सुरू असताना जेव्हा-जेव्हा तेथील रहिवाशांनी आपले म्हणणे मांडण्याचा प्रयत्न केला तेव्हा-तेव्हा संबंधितांकडून दुर्लक्षच करण्यात आले. पावसाळ्याच्या दिवसात सदर बोगद्यातून ये-जा करणे धोक्याचे ठरत असल्याने रेल्वे फाटक क्रमांक ८४ हे सूरू ठेवण्यात यावे, अशी मागणी तेथील ग्रामस्थांची आहे. पहिल्याच पावसामुळे तेथील रहिवाशांचा इतर गावांशी संपर्क तुटला होता. त्यानंतर पं.स. सदस्य हेमचंद रंगारी, नागपूरचे माजी नगरसेवक मधु घाटे, गजू दुतारे, गौरव गावंडे, देवेंद्र दुबे, उपसरपंच विजय श्रीरामे, अरविंद खोडके यांनी सदर समस्या खा. रामदास तडस यांच्या समक्ष मांडली. त्यावर खासदार तडस यांनी रेल्वे विभागाच्या नागपूर कार्यालयातील अधिकाऱ्यांशी बोलून योग्य कार्यवाही करण्याचे आश्वान दिले होते. शेतकरी व नागरिकांची समस्या लक्षात घेवून योग्य कार्यवाहीची मागणी आहे.ग्रामस्थांशीच दगाफटका?बोगदा तयार झाल्यावरही रेल्वे फाटकावरून ये-जा सुरू ठेवण्यात येईल, असे आश्वासन रेल्वे विभागाच्या अधिकाºयांकडून देण्यात आले होते; पण हे आश्वासन पाळण्याकडे दुर्लक्षच केल्या जात आहे. त्यामुळे रेल्वे विभागाचे अधिकारी व कर्मचारी ग्रामस्थांशी दगाफटका तर करीत नाही ना, असा प्रश्न सध्या नागरिकांकडून विचारला जात आहे.
रेल्वे फाटक चार महिन्यांसाठी सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:21 AM
दहेगाव (गावंडे) येथे रेल्वे रुळ ओलांडण्यासाठी बोगदा तयार करून तेथून ये-जा करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतकेच नव्हे तर रेल्वे फाटक बंद करण्यात आले आहे.
ठळक मुद्देग्रामस्थांची मागणी : रेल्वे विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज