लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जा.ब. विज्ञान महा.च्या प्रागंणावर राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धा आयोजित आहे. या स्पर्धेत राज्यातील ८ विभागांतून १४, १७ व १९ वर्षे वयोगटातून मुला-मुलींचे संघ सहभागी झालेत. स्पर्धेचे उद्घाटन सोमवारी क्रीडा उपसंचालक सुभाष रेवतकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, प्राचार्य ओम महोदय उपस्थित होते.स्पर्धेत १९ वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात कोल्हापूर संघाने लातूरचा पराभव केला तर नागपूर विभागाने मुंबई विभागावर ३५-३३, २७-३५ व ३५-२६ असा विजय मिळविला. औरंगाबाद विरूद्ध अमरावती सामन्यात ३५-१५, ३५-१८ अशा गुण फरकाने औरंगाबाद विजयी झाला. याच गटात मुलांच्या विभागात कोल्हापूर विरूद्ध लातूरमधील सामन्यात लातूर विजयी तर नाशिक विरूद्ध नागपूर विभागाच्या सामन्यात नागपूर विजयी ठरला. १७ वर्षे वयोगटात मुलींच्या विभागात लातूर संघाने कोल्हापूरवर मात केली. मुंबईविरूद्ध नागपूर सामन्यात नागपूरने विजय मिळविला. मुलांच्या विभागात मुंबई-नागपूर सामन्यात ३५-२९, ३५-२९ अशा गुणफरकाने नागपूर संघ विजयी झाला. औरंगाबाद विभागाने लातूर विभाग संघावर मात केली. अमरावती संघाने कोल्हापूर संघाचा तर पुणे संघाने नाशिकचा पराभव केला. १४ वर्षे वयोगटात मुलींच्या नागपूर विरूद्ध नाशिक सामन्यात नागपूर संघाने बाजी मारली. लातूर संघाने अमरावतीचा पराभव केला. याच वयोगटात मुलांच्या नागपूर संघाने औरंगाबादचा पराभव केला. पुणे संघाने नाशिकवर, कोल्हापुरने मुंबईवर व अमरावतीने लातुरवर मात केली. पंच म्हणून सौगत दत्ता, रूपेश भोसले, भूषण राजशिखरे, लक्ष्मी घले, विनोद गराड, नेहा बलविर, मनोज वंजारी, विक्रम झाडे, सागर भुरे आदींनी काम पाहिले. स्पर्धेचे संयोजन डॉ. सुरेश व डॉ. नंदीनी बोंगाडे करीत आहे.स्पर्धेत वर्धा जिल्ह्यातील संघांनी राखला वरचष्मास्पर्धेत सकाळच्या सत्रातील सामन्यांपैकी नागपूर विभागाचे चार संघ उपांत्य फेरीत दाखल झाले आहेत. यात वर्धा जिल्ह्यातील संघाने वरचष्मा राखला. जे.बी. सायन्स कॉलेज वर्धा, मधुबन कॉन्व्हेंट वर्धा आणि सुशिल हिम्मतसिंगका वर्धा या संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करून आघाडी मिळविली. यातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी संघाची निवड करण्यात येणार आहे. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूंचीही राष्ट्रीय स्तराकरिता निवड होणार आहे.
राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धेला थाटात प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 11:48 PM
क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे तथा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जा.ब. विज्ञान महा.च्या प्रागंणावर राज्यस्तरीय शालेय बॉलबॅडमिंटन स्पर्धा आयोजित आहे.
ठळक मुद्देआठही विभागातील संघ सहभागी : वर्धेतील खेळाडूंची चमकदार कामगिरी