लोकमत न्यूज नेटवर्कदेवळी : येथील मुख्य डाकघरात रेल्वेआरक्षण केंद्राचा प्रारंभ शहीद अशोक गेडाम यांच्या पत्नी जनाबाई गेडाम, ज्येष्ठ नागरिक रमेश आचार्य, डॉ. कृष्णराव कामडी, केशवराव भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कार्यक्रमाला नगराध्यक्ष सुचिता मडावी, उपाध्यक्ष डॉ. नरेंद्र मदनकर, गटनेत्या शोभा तडस, सभापती मिलिंद ठाकरे, सभापती संगीता तराळे तसेच पोष्ट मास्तर एस.एच. गायकवाड, दीपक डेकाटे, रोशन तोडसाम, नागपूर रेल्वे विभागाचे एससीएम व्ही.पी. थूल, तुषार तेलंग, अभय पुनवटकर, प्रवीण कवाडे, नितीन कुंभारे, मनोज टोपे, आनंद चैधरी, अनुप चव्हाण आदी प्रामुख्याने उपस्थित होते.देवळी पोस्ट आॅफीस रेल्वे आरक्षण केंद्रामध्ये रेल्वे तिकीट काढणे, रद्द करणे आदी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून भविष्यात लवकरच वर्धा-नांदेड रेल्वे मार्गाचे कार्यान्वयन झाल्यानंतर या सेवेचा लाभ अधिक संख्येने वाढवून पोस्ट विभागाच्या उत्पन्नात भर पडणार आहे.आधार नोंदणी व दुरुस्ती, पासपोर्ट सेवा, पोस्ट बँकिंग, रेल्वे आरक्षण या सर्व नवीन योजनेच्या माध्यमातून डाक विभागाला उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण झाला असून या नवीन सेवेमुळे परिसरार समाधान व्यक्त केले जात आहे. या केंद्राला भेट देत खासदार रामदास तडस यांनी प्रवासासाठी आरक्षित तिकीट काढले. या केंद्रामुळे परिसरातील नागरिकांना तिकीट काढण्यासाठी पुलगाव, वर्धा येण्याचा त्रास वाचणार आहे.
देवळी डाकघरात रेल्वे आरक्षण केंद्राचा प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 11:58 PM
येथील मुख्य डाकघरात रेल्वे आरक्षण केंद्राचा प्रारंभ शहीद अशोक गेडाम यांच्या पत्नी जनाबाई गेडाम, ज्येष्ठ नागरिक रमेश आचार्य, डॉ. कृष्णराव कामडी, केशवराव भोयर यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
ठळक मुद्देशहीद जवानाच्या पत्नीने केले उद्घाटन : प्रवाशांची सोय