लोकमत न्यूज नेटवर्कवर्धा : मागील पाच वर्षात शहरात विविध विकास कामांचा सपाटा सुरू आहे. त्यात आता आणखी भर पडली असून ४९ कोटी ५ लाख रुपयांच्या निधीतून वर्धा शहर पोलीस ठाण्याची अत्याधुनिक सुविधांसह इमारत साकार होणार आहे. त्यामुळे बजाज चौकाच्या सौंदर्यात आणखी भर पडणार आहे. सोबतच कर्मचाऱ्यांसाठी २०० फ्लॅटची निर्मिती करण्यात येणार आहे. आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या सततच्या प्रयत्नामुळे हा निधी प्राप्त झाल्याने पोलीस विभागाकडून समाधान व्यक्त होत आहे.पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस, आमदार डॉ.पंकज भोयर यांच्या हस्ते गुरुवारी या विकास कामांची पायाभरणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी विवेक भिमनवार, पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश बकाने,नगराध्यक्ष अतुल तराळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक निलेश ब्राह्मणे, शहर ठाण्याचे ठाणेदार योगेश पारधी, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक अशोक चौधरी, भाजपचे शहर अध्यक्ष प्रशांत बुरले, माजी जिल्हा परिषद सभापती मिलिंद भेंडे व अधिकारी उपस्थित होते. यावेळी पालकमंत्री बावनकुळे म्हणाले की, पांच वर्षात शहराचा विकासासाठी आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या शर्थीच्या प्रयत्नामुळे मोठया प्रमाणात निधी मिळाला आहे. केंद्र व राज्य सरकारने विविध योजना अंमलात आणल्या असून त्याचा लाभ सर्वसामान्य जनतेला मिळत आहे. अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्या इमारतींचे आधुनिकीकरण व नव्याने बांधकाम करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस शहराचा व्याप वाढत असल्याने दर्जेदार व आधुनिक सुविधायुक्त ठाणे असणे आवश्यक असल्याने आमदार डॉ. भोयर यांनी सतत प्रयत्न केले. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ४९ कोटी ५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला. या निधीतून शहर ठाण्याची इमारत होणार आहे. सोबतच अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी २०० फ्लॅट्स तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले.अशी राहणार इमारतीची रचनापोलीस मुख्यालय परिसरात अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी टाईप २ व ३ च्या एकूण ८ इमारती बांधण्यात येणार आहे. टाईप २ मध्ये ७ इमारती बांधण्यात येणार असून २८ फ्लॅट्स एका इमारतीमध्ये असे एकूण १९६ फ्लॅटस राहणार आहे. प्रत्येक इमारत २३३१.३० चौरस मीटरची राहणार आहे. टाईप ३ मधील इमारत ४४७.३७ चौरस मीटरची राहणार असून यामध्ये फक्त ४ फ्लॅट्स राहणार आहे. वर्धा शहर पोलीस ठाण्याची इमारत १६३५.९१ चौरस मीरट जागेत साकारण्यात येणार आहे. वर्धा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या इमारतीप्रमाणे ती असणार आहे. शहराच्या मुख्य चौकात ही इमारत होणार असल्याने चौकाच्या सौंदर्यात भर पडणार आहे.या इमारतींचा कायापालटवर्धा शहरातील अनेक सरकारी कार्यालयाच्या इमारतीचा कायापालट आमदार डॉ. पंकज भोयर यांच्या प्रयत्नामुळे झाला आहे.जिल्हा शासकीय ग्रंथालयाची इमारत, बस स्थानकाचे आधुनिकीकरण, महिला रुग्णालयाची स्वतंत्र इमारत, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे नुतनीकरण, आरटोओ कार्यालय, कृषी अधीक्षक कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय इमारत आदीचा कायापालट झाला असून काहींचे काम प्रगतीपथावर आहे.
वर्धा पोलीस ठाण्याची अत्याधुनिक इमारत साकारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2019 6:00 AM
अनेक शासकीय कार्यालयाच्या इमारती जीर्ण झाल्या होत्या. त्या इमारतींचे आधुनिकीकरण व नव्याने बांधकाम करण्यात आलं आहे. दिवसेंदिवस शहराचा व्याप वाढत असल्याने दर्जेदार व आधुनिक सुविधायुक्त ठाणे असणे आवश्यक असल्याने आमदार डॉ. भोयर यांनी सतत प्रयत्न केले.
ठळक मुद्देबजाज चौक सौंदर्यीकरणात भर : पोलीस कर्मचाऱ्यांसाठी दोनशे सदनिकांचे निर्माण